आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वोच्च न्यायालयाने नुकतेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या 6 आरोपींची सुटका करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, या बहुचर्चित प्रकरणातील आरोपी नलिनी श्रीहरण, तिचा पती मुरुगन व संथन यांची शनिवारी सायंकाळी वेल्लोर तुरुंगातून सुटका करण्यात आली. नलिनीने पॅरोलच्या अटींनुसार सकाळी सकाळी एका स्थानिक पोलिस ठाण्यात आपली हजेरीही लावली होती.
सुप्रीम कोर्टाने गत मे महिन्यात सातवा आरोपी पेरारिवलनच्या सुटकेसाठी स्वतःच्या अधिकारांचा वापर केला होता. 'उर्वरित दोषींवरही हा आदेश लागू होतो. तामिळनाडूच्या मंत्रिमंडळाने 2018 मध्ये राज्यपालांकडे आरोपींची सुटका करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार राज्यपाल यासाठी कटिबद्ध होते,' असेही न्यायालयाने म्हटले होते.
आरोपींचे तुरुंगातील वर्तन समाधानकारक
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये एका प्रचारसभेत हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी नलिनीसह श्रीहरण, संथन, मुरुगन, रॉबर्ट पायस व आर पी रवीचंद्रन तुरुंगात बंदिस्त होते. सुप्रीम कोर्टाने या सर्वच आरोपींच्या वर्तनावर समाधान व्यक्त केले होते. 'आरोपींचे तुरुंगातील वर्तन समाधानकारक होते. त्यांनी तुरुंगात डिग्री घेतली, पुस्तके लिहिली व समाज सेवेतही भाग घेतला,' असे कोर्ट म्हणाले होते.
नलिनी श्रीहरणचा भाऊ बकियानाथनने सांगितले की, "आरोपींनी यापूर्वीच 3 दशकांचा काळ तुरुंगात काढला आहे. त्यांनी खूप काही सहनही केले आहे." बकियानाथन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले की, "त्यांची मानवीय आधारावर सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेला विरोध करणाऱ्यांनी भारतीय कायद्यांचा सन्मान केला पाहिजे."
काँग्रेसचा सुटकेला विरोध
दुसरीकडे, काँग्रेसने राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला कडाडून विरोध केला होता. सुप्रीम कोर्टाचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा निर्णय पूर्णतः अस्वीकारार्ह व चूक आहे, असे काँग्रेसने म्हटले होते.
सोनियांनी दोषी नलिनीला केले होते माफ
राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी यांना अटक झाली तेव्हा ती गर्भवती होती. तिला गरोदर होऊन दोन महिने झाले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी नलिनी यांना माफ केले. अद्याप जगात न आलेल्या नलिनीच्या चुकीची शिक्षा एका निष्पाप मुलाला कशी दिली जाऊ शकते, असे त्या म्हणाल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.