आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीपेरुम्बुदुर येथील सभेत ड्यूटी करणाऱ्या तत्कालीन महिला पोलिस अधिकारी अनुसूया डेझी अर्नेस्ट यांनी आपली व्यथा मांडली आहे. स्फोटातील मृत व जखमींच्या न्यायाचे काय? माझ्यावर अजूनही उपचार सुरू आहेत. मला छर्रे लागले होते. त्याच्या जखमा आहेत. दहशतवाद्यांना सामान्य गुन्हेगारासारखी नव्हे तर दहशतवादी कायद्यानुसार वागणूक द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. अर्नेस्ट निवृत्त झाल्या आहेत.
मी दहशतवादी नाही : नलिनी २७ डिसेंबर २०२१ पासून पॅरोलवर असलेली नलिनी शुक्रवारी मीडियाला म्हणाली, मी दहशतवादी नाही. गेल्या ३२ वर्षांपासून तुरुंगात होते. हे संघर्षाचे दिवस होते. माझे समर्थन करणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. विश्वासासाठी तामिळनाडू व सर्व वकिलांनाही धन्यवाद देते.
निर्णयाचे स्वागत : स्टॅलिन राजीव गांधी यांच्या हत्येमधील दोषींच्या सुटकेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन म्हणाले, मी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे स्वागत करतो. राज्यातील विरोधी पक्ष एआयडीएमकेनेही स्वागत केले आहे.
हेही मुक्त झाले.. संथन : राजीव गांधी यांना बाॅम्बने उडवणाऱ्या धनूचा मित्र. हल्लेखोरांना मदतीचा आरोप होता. मुरुगन : जाफनाही आला होता. लिट्टेचा प्रशिक्षक. बाॅम्बतज्ज्ञ. नलिनी श्रीहरनशी विवाह झाला होता. पयासवर : पयासवर गँगमधील सदस्यांची राहण्याची व शस्त्रपुरवठ्याची जबाबदारी होती. जयकुमारन : जयकुमारच्या बहिणीचा विवाह पयासशी झाला होता. स्फोट घडवणाऱ्यांच्या मदतीसाठी त्यास लिट्टेने पाठवले होते.
एजी पेरारिवलन : १९९१ मध्ये अटकेवेळी इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये पदविकाधारक. पेरारिवलनने तुरुंगात राहून बीसीए व एमसीए केले होते. १८ फेब्रुवारी २०१४ रोजी सुप्रीम कोर्टाने मृत्युदंडाला जन्मठेपेत बदलले. सुप्रीम कोर्टाने मे २०२२ मध्ये मुक्त केले. त्याची सुटका हाच इतरांच्या सुटकेचा आधार ठरला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.