आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajiv Kumar Appointed Next Chief Election Commissioner, To Assume Charge On May 15

भारतीय निवडणूक आयोग:राजीव कुमार यांची देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती; 15 मे रोजी पदाचा स्वीकारतील

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची निवड झाली आहे. मावळते मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते 14 मे 2022 रोजी पदमुक्त होणार आहेत. राजीव कुमार हे 15 मे 2022 रोजी आपला कार्यभार सांभाळतील. विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे.

केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे. ​​​​​​

कोण आहेत राजीव कुमार?
राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी,1960 रोजी झाला असून ते भारतीय प्रशासनिक सेवेमधले 1984 च्या तुकडीतले अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षांपेक्षा जास्त काळ भारत सरकारमध्ये सेवा केली. आपल्या कार्यकाळामध्ये राजीव कुमार यांनी केंद्राबरोबरच बिहार, झारखंड या गृहराज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्रालयामध्ये कार्य केले. राजीव कुमार यांनी बी.एससी, एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक नीती याविषयामध्ये एम. ए. केले आहे. त्याचबरोबर त्यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मनुष्य बळ विकास, वित्तीय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये कामाचा व्यापक अनुभव आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामामध्ये अधिक पारदर्शकता आणणे आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सेवा-सुविधा पोहोचवणे, यामध्ये येणा-या मध्यस्थांना टाळून व्यवस्थेमध्ये धोरणात्मक संशोधन करून परिवर्तन घडवून आणण्याविषयी राजीव कुमार कटिबद्ध आहेत.

शास्त्रीय आणि भक्तीसंगीताची आवड -
राजीव कुमार सरकारचे वित्त सचिव म्हणून फेब्रुवारी2020 मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी एप्रिल 2020 पासून सार्वजनिक उद्योग निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या पदावर ते 31 ऑगस्ट 2020 पर्यंत कार्यरत होते. राजीव कुमार यांनी सन 2015-17 या काळामध्ये कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामध्ये आस्थापना अधिकारी म्हणून काम केले. त्यापूर्वी ते व्यव विभागाचे संयुक्त सचिव म्हणून कार्यरत होते. तसेच राजीव कुमार यांनी आदिवासी कार्य मंत्रालय आणि पर्यावरण आणि वन मंत्रालय त्याचबरोबर राज्यामध्ये शिक्षण विभागामध्ये कार्य केले आहे. राजीव कुमार यांना गिर्यारोहणाचा छंद आहे त्याचबरोबर भारतीय शास्त्रीय आणि भक्तीसंगीताची त्यांना आवड आहे.

राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका होणार -
राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 रोजी झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत आहे. म्हणजेच पुढील विधानसभा निवडणुकीपासून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...