आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajiv Kumar Trekked 18 KM To Find Out The Problems Of The Polling Team, Latest News And Update

मुख्य निवडणूक आयुक्तांची 'पर्वत यात्रा':राजीव कुमारांनी 18 KM ट्रेक करुन जाणून घेतल्या पोलिंग टीमच्या समस्या

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी रविवारी डोंगराळ भागात पोलिंग पथकाला येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी 18 किमीचे अंतर पायी कापले. ते हेलिकॉप्टरने पीपलकोटीत उतरले. त्यानंतर उत्तराखंडच्या दुर्गम दुमक व कलगोथ गावात पायी पोहोचले. या गावांत पोहोचण्याठी मतदान अधिकाऱ्यांना 3 दिवस लागतात.

राजीव म्हणाले -निवडणुकीदरम्यान पोलिंग टीमसमोरील आव्हाने समजून घेण्यासाठी मला येथे भेट द्यायची होती. टीमच्या गरजा समजून घेण्यासाठी मी अशा आणखी काही मतदान केंद्रांना भेट देईल.

जुलै 2024 मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात होणार आहेत.
जुलै 2024 मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वात होणार आहेत.

निवडणूक आयुक्त झाल्यानंतरचा पहिला दौरा

राजीव कुमार यांनी 15 मे 2022 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. तत्पूर्वी सुशील चंद्रा यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी पूर्ण झाला होता. आयोग दुर्गम क्षेत्र विशेषतः पाक सीमेलगतची गावे, नक्षलवाद व दहशतवादग्रस्त भागांत तैनात मतदान अधिकाऱ्यांना हार्डशिप अलाउंस व विमा संरक्षण देण्याचा विचार करत असताना कुमार ही पदयात्रा काढत आहेत.

दुमकमध्ये केवळ 290 मतदार

दुमक व कलगोथ मतदान केंद्र बद्रीनाथ विधानसभेत येतात. गोपेश्वरहून जवळपास 60 किमी अंतरावर असणाऱ्या दुमक गावात केवळ 290 मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथील 80 टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त एक ट्रेंड ट्रेकर असून, यापूर्वी त्यांनी हिमालयाच्या वरच्या भागांचा पायी प्रवास केला आहे. यात लडाख, हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम, तिबेट आदींचा समावेश आहे. त्यांना सह्याद्री, पश्चिम घाट व पालघाटच्या ट्रेकिंगचाही अनुभव आहे.

बातम्या आणखी आहेत...