आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajkot Young Man 6 Time Win Against Mucormycosis And 7th Time Ditect But Do Not Lose Courage

एक्सक्लूसिव्ह:गुजरातच्या तरुणाने 6 वेळा केली ब्लॅक फंगसवर मात, आता 7 व्यांदा न्यूरो सर्जरीचे आव्हान; 41 लाख रुपये झाले खर्च, अजून 15 लाख लागणार

राजकोट (जिग्नेश कोटेचा)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 व्यांदा म्यूकरमाइकोसिस डिटेक्ट झाला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता म्यूकरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस महामारी अडचणींमध्ये वाढ करत आहे. मात्र गुजरातच्या राजकोटमध्ये ब्लॅक फंगसने संक्रमित झालेला तरुण विमल जोशीच्या धाडसाची कहाणी खूप हिंमत देणारी आहे. कारण विमल जोशींच्या गेल्या पाच महिन्यात 6 मेजर सर्जरी झाल्या आहेत आणि आता त्यांची सातवी सर्जरी होणार आहे.

हा आत्मविश्वास टिकवून ठेवण्याचे श्रेय विमल जोशी यांच्या पत्नी चांदनी जोशी यांनाही जाते, त्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून पतीबरोबर सर्व प्रकारच्या अडचणी सहन केल्या. पण त्यांच्या पत्नीला खात्री आहे की सातवी शस्त्रक्रिया देखील यशस्वी होईल आणि नवरा बरे होऊन व घरी परत येईल. दैनिक भास्करशी बोलताना चांदनी यांनी सांगितले की संपूर्ण सेविंग्स खर्च झाल्यानंतर आता घरही विकले आहे. उपचारात आतापर्यंत 41 लाखांचा खर्च आला आहे आणि अजुनही त्यांना 10-15 लाख रुपयांची अजून गरज आहे.

विमल यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण त्यांच्यासाठी एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण, विमलवर आतापर्यंत 6 मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे विमल नोव्हेंबरपासून रुग्णालयात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेतच ते कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनातून बरे झाले तर म्यूकरमाइकोसिसच्या विळख्यात सापडले आणि आतापर्यंत ते यामधून बरे झालेले नाहीत.

7 व्यांदा म्यूकरमाइकोसिस डिटेक्ट झाला
चांदनी यांनी सांगितले की, 'विमल यांच्यावर आतापर्यंत चार लेप्रोस्कोपी, एक फोरहेड आणि एकदा ब्रेन सर्जरी झाली आहे. आम्हाला वाटले होते की, आतापर्यंत ते पूर्णपणे बरे झाले आहेत. तेव्हाच त्यांच्या ब्रेनमध्ये पुन्हा म्यूकरमाइकोसिस डिटेक्ट झाला. आता न्यूरो सर्जरीची तयारी केली जात आहे.'

किडनीवर परीणाम झाल्याने 96 हजारांची औषधे
अनेक वेळा सर्जरीमुळे विमल यांच्या किडनीवर गंभीर परीणाम झाला आहे. यामुळे त्यांना महागडे औषधे घ्यावी लागत आहेत. सध्या त्यांना 96 हजार रुपयांचे औषध देण्याची गरज आहे. या औषधांचा कोर्स पूर्ण झाल्यानंतरच त्यांची न्यूरो सर्जरी केली जाईल.

विमल यांच्या पत्नी चांदनी म्हणाल्या की, घरातील सर्व पैसा उपचारांमध्ये खर्च झाला आहे. अनेक ओळखीचे आणि नातेवाईकांकडून आर्थिक मदत घेऊन झाली आहे. घरही विकले आहे. यामुळे आता अजिबात पैसे उरलेले नाही. आता विमल यांची न्यूरो सर्जरी होणार आहे. भास्करच्या वृत्ताच्या माध्यमातून त्यांना आशा आहे की, लोक किंवा सामाजिक संस्था त्यांच्या मदतीसाठी पुढे येतील. मदत करणारे लोक चांदनी यांचे आयसीआयसीआय बँक अकाउंट नंबर 624801521246 मध्येही रक्कम जमा करु शकतात.

बातम्या आणखी आहेत...