आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन संघर्षानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पहिल्याच राज्याच्या दौऱ्यावर आहेत. सियांग येथे राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संबोधित केले. यावेळी भारताला युद्ध नको आहे. परंतु जर युद्ध आमच्यावर लादले गेले तर आम्ही कोणत्याही आव्हानाला आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत, असे ते म्हणाले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने बांधलेल्या पुलाचे उद्घाटन करण्यासाठी ते येथे आले होते. संरक्षण मंत्री म्हणाले की, भारत कधीही युद्धाला प्रोत्साहन देत नाही. आम्हाला आमच्या शेजाऱ्यांशी नेहमी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायचे आहेत. हा वारसा आम्हाला भगवान राम आणि बुद्ध यांच्याकडून मिळाला आहे. मात्र, भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम आहोत. यावेळी राजनाथ सिंह यांनी 'हे युद्धाचे युग नाही' या पंतप्रधान मोदींच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, येथे कोणालाही संदेश द्यायचा नाही. एक मोठा कार्यक्रम होता म्हणूनच आम्ही आलो आहोत. रमी बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) आणि BRO(भाऊ) यांच्याबद्दल संभ्रमात होतो. परंतु ते करत असलेले काम पाहून मला वाटते की ते खरोखरच सशस्त्र दलांचे भाऊ आहेत. डोंगराळ भागात बीआरओ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
राजनाथ सिंह म्हणाले की, बीआरओच्या वतीने देशाच्या सीमावर्ती भागात 28 प्रकल्प राष्ट्राला समर्पित करताना मला आनंद होत आहे. BRO@2047 व्हिजन डॉक्युमेंट जारी करतानाही मला आनंद होत आहे. ते ज्या गतीने काम करत आहेत ते कौतुकास्पद आहे. सरकारचे प्राधान्य अधिकाधिक सीमावर्ती भागांना जोडणे आहे, जेणेकरून तेथे राहणाऱ्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची भावना निर्माण होईल.
चीन आणखी हल्ले करणार
16 ऑक्टोबर 2022 चा दिवस होता. बीजिंगचे Great Hall of the People हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या 2,300 प्रतिनिधींनी भरले होते, त्यांनी एकाच पद्धतीचे कपडे घातले होते आणि ते एकाच पद्धतीने बसले होते. निमित्त होते चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या म्हणजेच CPC च्या परिषदेचे. सीपीसी हा चीनमधील एकमेव राजकीय पक्ष आहे. कम्युनिस्ट क्रांतीच्या नावाखाली हा पक्ष 1948 पासून चीनमध्ये सत्तेत आहे. पाच वर्षांतून एकदा होणाऱ्या सीपीसीच्या या परिषदेत चीनच्या सर्व प्रमुख निर्णयांवर शिक्कामोर्तब केले जाते. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.