आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajnath Singh; Air India Show Bangalore Latest Photo Update | Defence Minister Rajnath Singh And Sukhoi Su 30, Mi 17V5 Today News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एयरो इंडिया शो 2021 सुरू:​​​​​​​राजनाथ सिंह म्हणाले - 'आता हे खऱ्या अर्थाने ग्लोबल आणि डिजिटल; 82 तेजस खरेदी करण्याला औपचारिक मंजूरी'

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एयरो इंडियाची सुरुवात 1996 मध्ये झाली होती.

एयरो इंडिया शो 2021 ची सुरुवात बुधवारी बेंगळुरूमध्ये झाली. ते शुक्रवार 5 फेब्रुवारीपर्यंत चालेल. उद्घाटन प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले- एयरो इंडिया शो आता खरोखरच जागतिक आणि डिजिटल झाला आहे. आपण हे व्हर्चुअलरी संपूर्ण जगात दाखवत आहोत. यामुळे या शोचा विस्तार होईल. म्हणून, हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की एयरो इंडिया 2021 जागतिक आणि डिजिटल बनले आहे.

एयरो इंडियाची सुरुवात 1996 मध्ये झाली होती. तेव्हापासून प्रत्येक दुसऱ्या वर्षी या शोचे आयोजन केले जाते. आजपासून याची 13 वी एडिशन सुरू होत आहे.

एयरो इंडिया शो किती दिवस चालणार
बुधवारी सुरू झालेला ऐरो इंडिया शो 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. 4 व 5 फेब्रुवारी रोजी दोन सत्रे होणार आहेत. पहिला सकाळी 9 वाजेपासून आणि दुसरा दुपारी 1.30 वाजेपासून असेल. प्रदर्शनादरम्यान एकूण पाच एअर शोदेखील होणार आहेत. उद्घाटन समारंभानंतर पहिल्या दिवशी. तसेच दुसर्‍या आणि तिसर्‍या दिवशी एअर शो सकाळी 9 नंतर असेल तर दुसरा दुपारी 1.30नंतर होईल.

संरक्षणावर अधिक लक्ष
राजनाथ म्हणाले - 'आम्ही संरक्षण क्षेत्रात सुरक्षा उपबंध बळकट करण्यावर भर देत आहोत. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत देशातही मोठी आणि गुंतागुंतीची उपकरणे तयार केली जात आहेत. भारत सरकार येत्या 7 ते 8 वर्षांत मिलिट्री आधुनिकीकरणावर 130 अब्ज डॉलर्स खर्च करेल.'

राजनाथ पुढे म्हणाले- भारत सरकारने संरक्षण क्षेत्रातील 74% FDI ला मान्यता दिली आहे. या व्यतिरिक्त ते शासन पातळीवर शंभर टक्के आहे. या माध्यमातून परदेशी गुंतवणूकदार आपल्या देशात येतील. मालदीव, गुयाना, इराण आणि मेडागास्करचे संरक्षण मंत्री येथे आल्याबद्दल त्यांचे आभार. काही संरक्षण मंत्री व्हर्जुअलरी सहभागी झाले आहेत. मला सांगितले आहे की 80 विदेशी कंपन्यांमधील 540 प्रतिनिधी यात भाग घेत आहेत. एकूण 55 देश या एयरो शोचा भाग आहेत.

कार्यक्रमा प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा
कार्यक्रमा प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुरप्पा

HAL बरोबर करार
बुधवारी एअरो शोच्या उद्घाटनानंतर संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांच्यात तेजस विमानाच्या करारास औपचारिक मान्यता देण्यात आली. एकूण 82 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजस खरेदी केली जातील. हा करार 48 हजार कोटींचा आहे.

गेल्या महिन्यात, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया म्हणाले होते- तेजस लढाऊ विमान चीन आणि पाकिस्तान यांच्यात संयुक्तपणे तयार केलेल्या JF-17 पेक्षा उच्च तंत्रज्ञानाचे आहे. बालाकोट स्ट्राइकपेक्षाही जास्त ताकदीने तेजस हल्ला करू शकतो. ते कोणत्याही शस्त्रांशी बरोबरी करण्यास सक्षम आहे.

बातम्या आणखी आहेत...