आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Rajnath Singh | India China Ladakh Border Tension News; Rajnath Singh Hold Discussions With CDS Bipin Rawat, Army Chief General MM Naravane And The Three Army Chiefs Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लडाखच्या परिस्थितीवर बैठक:संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सीडीएस रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांसोबत करणार चर्चा, एनएसए डोभाल यांची चीनच्या विदेश मंत्र्यांसोबत होऊ शकते बैठक 

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गलवानमध्ये वादग्रस्त भागातून चीनच्या माघारीनंतर पहिली डिप्लोमेटिक बैठक होणार
 • हॉट स्प्रिंग, पेट्रोलिंग पॉइंट -14 आणि 15 येथे भारत-चीनची डिसइंगेजमेंट प्रोसेस सुरू

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेवा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेत (एलएसी) च्या परिस्थितीबद्दल चर्चा केली जाईल. तसेच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल.

गलवानमध्ये 3 पॉइंट्सवर डिसइंगेजमेंट होणार पूर्ण 
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची आज लडाखमधील सीमा वादावर पुन्हा बैठक होऊ शकते. गलवानमधील वादग्रस्त भागातून दोन्ही सैन्याने माघार घेतल्यानंतर ही पहिली चर्चा होईल. तत्पूर्वी, हॉट स्प्रिंग (पेट्रोलिंग पॉईंट -17), पीपी -14 आणि पीपी -15 वर भारत आणि चीनने डिसइंगेजमेंट गुरुवारी पूर्ण झाली. वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैन्यही फिंगर एरियातून सातत्याने माघार घेत आहे. ही प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला होता. हा तणाव कमी करण्यासाठी 5 जुलैला एनएसए अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वाचे बैठक झाली होती. यामध्ये वादग्रस्त क्षेत्रातून सैन्य हटविण्यासह 5 मुद्द्यांवर सहमती दर्शविली गेली-

 • पॉईंट पीपी -14, पीपी -15, हॉट स्प्रिंग्ज आणि फिंगर एरियामध्येही भारत आणि चीनमध्ये वाद आहे. सैनिक या भागातूनही माघार घेतील.
 • सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि संबंध वाढविण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांशी ताळमेळ ठेवायला हवा. जर विचार जुळले नाही तर वाद उपस्थिती करु नये. 
 • एलएसीवरील सेना हटवण्याची आणि डी-एस्केलेशनची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. हे काम फेज वाइज करण्यात यावे.
 • दोन्ही देशांनी एलएसीचा आदर करावा आणि एकतर्फी पाऊले उचलू नयेत. भविष्यातील सीमा घटना टाळण्यासाठी एकत्र मिळून काम करावे. 
 • एनएसए डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री पुढील चर्चा सुरू ठेवतील जेणेकरुन दोन्ही देशांच्या करारांनुसार सीमेवर शांतता व प्रोटोकॉल टिकून राहावा. 
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser