आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajnath Singh Said Will Not Compromise The Security Of The Country; Now The People Of PoK Want To Live With India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संरक्षणमंत्र्यांची जम्मू-काश्मीरात व्हर्चुअल रॅली:राजनाथ सिंह म्हणाले- देशाच्या सुरक्षेत तडजोड शक्य नाही; काही वर्षात पीओकेमधील लोक भारतात राहण्याची मागणी करतील

जम्मू10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि 35-ए हटवणे, हे 1952 पासून भाजपच्या घोषणा पत्रात होते'
  • 'केंद्राने 2014 ते 2019 पर्यंत 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी दिले'

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी व्हर्चुअल (ऑनलाइन) रॅलीने जम्मू-काश्मीरातील नागरिकांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचे चित्र पालटणार आहे. राज्यातील विकास, हिच आमची प्राथमिकता आहे. थोडी वाट पाहा, लकरच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके)मधील लोकच भारतात राहण्याची मागणी करतील. ज्या दिवशी असे होईल, त्या दिवशी आमचा संकल्प पूर्ण होईल.

ते पुढे म्हणाले की, काश्मीरमध्ये पाकिस्तान किंवा आयएसचा झेंडा दिसायचा. भारतातून स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या. पण, आज काश्मीरमध्ये फक्त तिरंगा दिसतो. पंतप्रधान मोदींनी जगभरात आपली प्रतिष्ठा वाढवली आहे. एका दशकापूर्वी आपल्यासोबत काही देश असायचे, आता परिस्थिती पालटली आहे. आता काही देशांव्यतिरिक्त जगभरातील अनेक देश आपल्याला समर्थन देतात. काही मुस्लिम देशांचाही आपल्याला पाठिंबा आहे.

'जम्मू-काश्मीरमध्ये शहीद जवानांना नमन करतो'

मी जम्मू-काश्मीरात शहीद झालेल्या लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसातील जवानांना प्रणाम करतो. काश्मीरमध्ये सरपंच अजय पंडिता यांची निर्घण हत्या करण्यात आली. मी त्यांना प्रणाम करतो. मी काश्मीरच्या बारामूलाचे रहिवासी मोहम्मद मकबूल शेरवानी यांना नमन करतो, ज्यांनी 1984 मध्ये काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला होता.

'सरकार सत्ते आल्यानंतर फक्त 100 दिवसात कलम 370 हटवली'

राजनाथ पुढे म्हणाले की, काश्मीरमधून कलम 370 आणि 35-ए हटवणे 1952 पासून भाजपच्या घोषणापत्रात सामील होते. विरोधी पक्ष म्हणत होते की, हे मुद्दे भाजप फक्त राजकारण करण्यासाठी उचलून धरते. आमची सरकार आल्यानंतर फक्त 100 दिवसात हे करुन दाखवलं. आम्ही हे सिद्ध केले की, आम्ही जे बोलतो, ते करतो. 

'काँग्रेसने 370 मुद्द्याला मुद्दामून टाळले'

जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही 50 मोठे काम केले. येथे आयआयटी आणि एम्ससारख्या संस्था उघडण्याची योजना आहे. कलम 370 बद्दल नेते म्हणायचे की, हे अस्थायी हे. हे संविधान सभेच्या इच्छेने आले नाही, नंतर आणण्यात आले. अनेक वर्षे जम्म्-काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता होती. त्यांनी 370 बद्दल कधीच विचार केला नाही, त्यांनी हा मुद्दा टाळला.

'जम्मू-काश्मीरमध्ये केंद्राने दिलेल्या पैशांचा योग्य उपयोग होत नसे'

2014 ते 2019 पर्यंत 2 लाख कोटींपेक्षा जास्त आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी दिले. यापूर्वीदेखील जम्मू-काश्मीर आणि लद्दाखला केंद्र सरकारकडून पैसे मिळत असे. पण, राज्यात भ्रष्टाचार होता. केंद्राकडून मिळालेल्या पैशांचा योग्य उपयोक होत नव्हता. पण, आता या पैशांचा योग्य ठिकाणी उपयोग होत आहे.

बातम्या आणखी आहेत...