आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajnath Singh Visit To Ladakh And Jammu Kashmir: Defense Minister Will Go To Amarnath Temple Today

राजनाथ सिंहांचा जम्मू-कश्मीर दौरा ::संरक्षणमंत्री अमरनाथ मंदिरात पोहोचले; एलओसीवरील फॉरवर्ड लोकेशंसचा घेऊ शकतात आढावा 

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिथून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात त्या भागात जाऊ शकतात संरक्षणमंत्री
  • सैन्याला सांगितले- शत्रूंच्या चुकीच्या हालचालींचा सामना करण्यासाठी तयार राहा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या जम्मू-काश्मीर दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. ते आज अमरनाथ मंदिरात दाखल झाले आणि त्यांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले. राजनाथांच्या भेटीदरम्यान सुरक्षा दलांमध्ये दहशतवाद्यांचा खात्माही करत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी 2 दिवसांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 21 जुलैपासून सुरू होणार्‍या अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याची दहशतवाद्यांची योजना असल्याचेही सैन्याने सांगितले आहे. 

न्यूज एजन्सी यूएनआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार राजनाथ सिंह हे नियंत्रण रेषेवरील काही फॉरवर्ड लोकेशंसवर जाऊन जवानांना भेटतील. ते ज्या भागातून दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात तिथे ते जाऊ शकतात. असे म्हटले जात आहे की, पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मिरमधून दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी काय केले जात आहे याची माहिती फील्ड कमांडर देतील. 

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबत राजनाथ सिंह समाधानी दिसले  शुक्रवारी लेहला भेट दिल्यानंतर संरक्षणमंत्री श्रीनगरला आले. चिनार कॉर्प्सच्या कमांडरने तेथे सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती दिली. जम्मू-काश्मीरमधील सीमा सुरक्षांबाबत राजनाथ सिंह समाधानी दिसले. शत्रूंच्या कोणत्याही चुकीच्या कृत्यावर कारवाई करण्यास तत्पर राहा असे त्यांनी सैन्याला सांगितले. संरक्षणमंत्र्यांसमवेत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल एम.एम. नरवणे देखील होते.

राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू, चीफ सेक्रेटरी, डीजीपी, सेंट्रल आर्म्ड पैरामिलिट्री फोर्सचे सीनियर अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांसोबत बैठक घेतली. सुरक्षा व्यवस्थेसाठी एजन्सींच्या समन्वयाचे त्यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...