आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीडच्या काँग्रेस नेत्या खासदार रजनी पाटील यांची काँग्रेसच्या राज्यसभा प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली असून प्रमोद तिवारी यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांची राज्यसभेतून निवृत्त झाले तर हिंगोलीचे काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर ही नियुक्ती केली आहे.
काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख साेनिया गांधी यांनी या नियुक्तीला मंजुरी दिल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर सांगितले. दोन वेळा राज्यसभा सदस्यत्व भूषवणाऱ्या रजनी पाटील यांना गैरवर्तवणूक केल्याबद्दल अर्थसंकल्पीय अधिवेशन कालाधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे राज्यसभेत सभागृह नेते आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.