आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:एमजीआर सारखे यश की विजयकांत यांच्यासारखी स्थिती?

चेन्नईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तामिळ सिनेमाच्या सुपरस्टारने 2021 च्या विधानसभा निवडणुकीत उतरण्याची घोषणा, 31 डिसेंबरला जाहीर होणार पक्ष

चेन्नईहून भास्करसाठी आर. राम कुमार
‘कोई नहीं जानता कि मैं कब और कैसे आऊंगा, लेकिन मैं जब भी आऊंगा राइट टाइम पर आऊंगा।’ हा तामिळ सुपरस्टार रजनीकांत यांच्या लाेकप्रिय संवादांपैकी एक संवाद आहे. २०२१ मध्ये हाेऊ घातलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष स्थापन करण्याच्या घाेषणेला त्यांचा हा डायलाॅग अगदी जुळताे. १२ डिसेंबर १९५० मध्ये बंगळुरूमध्ये एका मराठी कुटुंबात जन्मलेले शिवाजीराव गायकवाड तामिळनाडूला आल्यानंतर रजनीकांत बनले. ते तामिळ सिनेमातील सुपरस्टारपैकी एक आहेत. आता एमजीआर, एम. करुणानिधी, जयललिता, विजयकांत यांच्याप्रमाणे त्यांनीही सिनेमाकडून राजकारणाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले आहे. म्हणूनच रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाचा हा अचूक टायमिंग वाटताे. ६९ वर्षीय रजनी यांनी गुरुवारी ३१ डिसेंबरला पक्षाची घाेषणा करून जानेवारीत त्याचे लाँचिंग करणार असल्याचे स्पष्ट केले.

लाेकांच्या अपार पाठिंब्याच्या जाेरावर आम्ही प्रामाणिक, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त, जातिरहित, धर्मनिरपेक्ष व आध्यात्मिक राजकारण करून दाखवू. अनेक शानदार चमत्कार करू. आता नाही तर कधीच नाही, अशी घाेषणा त्यांनी दिली. आम्ही सर्वकाही बदलून टाकू. रजनीकांत यांची ही घाेषणा अनेक अर्थाने महत्त्वाची आहे. आॅक्टाेबरमध्ये ते म्हणाले, आराेग्याचा विचार करून काेराेना महामारीच्या या काळात डाॅक्टरांनी राजकारणात उतरण्यास मनाई केली. परंतु, आता रजनीकांत यांनी अखेर गुरुवारी दाेन दशकांचा सस्पेन्स संपवला.

मी तामिळ लाेकांसाठी प्राण द्यायलाही तयार आहे. हे वचन मी कधीही माेडणार नाही. एक राजकीय परिवर्तन हवे. त्याची खूप गरज वाटते. राजकारणात उतरल्यानंतर विजय हाेवाे अथवा पराभूत झालाे तरी ते सर्व जनतेचे असेल.

स्टारडमशिवाय आघाडी, उमेदवार, जातीय ध्रुवीकरणाची गरज
रजनीकांत निश्चितपणे तामिळनाडूच्या राजकारणावर परिणाम टाकतील. त्यांचा फॅनबेस खूप माेठा आहे. तरुणांमध्येही माेठे अपील दिसते. परंतु, त्यांच्या पक्षाला राज्यात किती जागा मिळतील, हे सांगणे कठीण वाटते. निकाल मात्र निवडणुकीतील भागीदार, बळकट उमेदवार, जातीय ध्रुवीकरणासारख्या मुद्द्यांवर अवलंबून असेल, असे राजकीय विश्लेषक रंगराजन यांना वाटते. रजनी यांचा पक्ष एआयडीएमके व द्रमुकसारख्या पक्षांतील दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरील नेत्यांना आकर्षित करू शकताे. त्याचबराेबर त्यांचा पक्ष एआयएडीएमके व भाजपच्या आघाडीवर जास्त परिणाम करू शकते. कारण त्यांनी आध्यात्मिक राजकारणाचा मुद्दा मांडला आहे. त्याचबराेबर ते नरेंद्र माेदी व अमित शहा यांचे चाहते देखील आहेत.

स्वबळावर लढू शकताे रजनीचा पक्ष, आघाडीची शक्यता कमी
राजकीय विश्लेषक राधाकृष्णन म्हणाले, २०१७ मध्ये रजनीकांत म्हणाले, आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढू शकताे. आता तसेच वाटते. त्यांचा पक्ष आघाडी करेल, असे वाटत नाही. परंतु, आघाडी न केल्यास त्यांनाही विजयकांत यांच्यासारखा पराभव पाहावा लागू शकताे. २००६ मध्ये विजयकांत यांच्या पक्षाने २३४ जागा लढवल्या हाेत्या. परंतु, त्यांना केवळ एकाच जागी विजय मिळाला हाेता. अर्थात विजयकांत विजयी झाले हाेते. दुसरीकडे रजनी फॅन क्लबमध्ये १ काेटींहून जास्त सदस्य आहेत. म्हणजेच एकूण मतदारांचे प्रमाण पाहिल्यास फॅन क्लबचे सदस्य १८ टक्के मतदारांत समाविष्ट हाेतात.

रजनीकांत म्हणाले, जनता आंदाेलनासाठी तयार हाेते. तेव्हा राजकारण हाेऊ शकते, असे मी म्हणालाे हाेताे. मी संपूर्ण तामिळनाडूचा दाैरा करू इच्छित हाेताे. परंतु, काेराेनामुळे हे शक्य झाले नाही. डाॅक्टरांनी मला राज्याचा दाैरा करण्यास मनाई केली आहे. लाेकांशी थेट बाेलण्यासही मनाई केली आहे.

खास बात : रजनीकांत यांच्यासाेबत भाजपच्या माजी इंटेलेक्चुअल सेलच्या माजी प्रमुख अर्जुनमूर्ती देखील उपस्थित हाेत्या. त्यांनी एक आठवड्यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser