आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहीद हवालदार नीलम सिंह यांचे गाव दलपत चकमधील शांत वातावरण शनिवारी त्यांची १० वर्षांची मुलगी पवनाच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या आक्रोशाने सुन्न हाेऊन गेले होते. वडिलांचे पार्थिव बघून पवनाचा अश्रूंचा बांध फुटला. ‘पापा तुम्ही उठत का नाहीय? प्लीज तुम्ही परत या, मला आणखी काहीच नको आहे.’ पवनाजवळच उभी तिची आई वंदना नि:शब्द झाल्या होत्या. त्यांना पती नीलम या जगात नाहीत, यावर विश्वासच बसत नव्हता. वंदनांनी शहीद पती नीलम यांचा चेहरा हातात घेत त्यांना अखेरचा निरोप दिला.
राजौरीतील कंडी गावात शुक्रवारी अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या ५ जवानांमध्ये नीलम सिंह होते. या अतिरेकी हल्ल्यात हिमाचल प्रदेशचे अरविंदकुमार व प्रमोद नेगी, उत्तराखंडचे रुचिन सिंह रावत आणि पश्चिम बंगालचे सिद्धांत छेत्री हेसुद्धा शहीद झाले आहेत.
ऑपरेशन त्रिनेत्र : राजौरीमध्ये एका अतिरेक्याचा खात्मा; राजनाथ म्हणाले-धीर धरा, यश मिळेल
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शनिवारी राजौरीत दाखल झाले. ते सैनिकांना म्हणाले, धीर धरा, आपल्याला नक्कीच यश मिळेल. लष्करप्रमुख मनोज पांडे हेदेखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान, लष्कराने ऑपरेशन त्रिनेत्रअंतर्गत शनिवारी राजौरीतील कंडी भागात एका अतिरेक्याचा खात्मा केला. त्याच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रेही जप्त केली. बारामुल्लातही सुरक्षा दलांनी चकमकीत एका अतिरेक्याला ठार केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.