आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajouri Army Camp Guard Fired | Suspected To Be A Terrorist; 2 Porter Killed, One Injured

राजौरीत आर्मी कॅम्पच्या पहारेदाराने केला गोळीबार:दहशतवादी असल्याचा संशय; 2 हमालांचा मृत्यू, एक जखमी

राजौरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी सकाळी लष्कराच्या एका पहारेकऱ्याने गोळीबार केला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचवेळी या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली, त्यानंतर लोकांनी लष्कराच्या छावणीवर दगडफेक केली.

दोन हमालांचा मृत्यू
लष्कराच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जे मृत झाले ते सैन्यात पोर्टर म्हणून काम करत होते. सकाळी 6.15 च्या सुमारास ते आर्मी कॅम्पच्या अल्फा गेटजवळ येत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. राजौरी येथील रहिवासी शालिंदर कुमार आणि कमल किशोर यांचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला.

संतप्त लोकांनी राजौरी-जम्मू महामार्ग रोखून धरला
पहारेदाराने दहशतवादी असल्याच्या संशयावरून गोळीबार केल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. यानंतर लोकांनी राजौरी-जम्मू महामार्गही रोखून धरला. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...