आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajsthan Politics | Ashok Gehlot Rajasthan Government Crisis LIVE Updates From Chief Minister House, Jaipur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजस्थानचा सत्तासंघर्ष:काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आमदारांना 4 बसमधून हॉटेलमध्ये पाठवले, बैठकीत गेहलोत यांच्या समर्थनार्थ ठराव संमत झाला

जयपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बैठकीस आलेल्या आमदारांना पोलिसांच्या सुरक्षेत आणले होते

मुख्यमंत्री गहलोत यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यानंतर गहलोत यांनी आपले सरकार सुरक्षित असल्याचे आश्वासन दिले. बैठकीनंतर तेथे उपस्थित सर्व आमदारांना चार बसने थेट माउंट फेअर हॉटेलमध्ये पाठवले. तत्पूर्वी, बैठकीस उपस्थित असलेल्या आमदारांना पोलिसांच्या एस्कॉर्टमध्ये सुरक्षिततेत आणले होते. गहलोत यांच्यासोतब 96 ते 98 आमदार आल्याची बातमी आहे. परंतु 107 आमदार सोबत असल्याचा दावा केला जात आहे. 

गहलोत सरकारमधील मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, "सरकारला कोणताही धोका नाही. आम्हाला 109 पेक्षा जास्त आमदारांचे समर्थन आहे. भाजपकडून जबरदस्तीने रोखण्यात येत असलेल्या आमदारांनी व्हिडिओ बनवून आणि शेअर करावे. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकार आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल."

दुसरीकडे आजच्या बैठकीत गैरहजर राहिलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले. यादरम्यान कामगार मंत्री टीकाराम जुली स्वतः कार चालवत मुख्यमंत्री निवासस्थानी पोहचले. बानसूरचे आमदार शकुंतला रावत आणि रामगडच्या आमदार सफिया जुबेर खान मुख्यमंत्री निवासस्थानावर पोहचले. 

राजकीय विश्लेषक सांगतात की, पायलट यांनी आपल्याला 30 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा केला असला तरी सद्यस्थितीत मात्र त्यांच्या बाजूने 15 आमदार असल्याचे चित्र आहे. गहलोत सरकारचे शक्तिशाली मंत्री इतर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. 

मुख्यमंत्री निवासस्थानात जेवणासाठी 115 आमदार पोहचल्याचा दावा 

मुख्यमंत्री गहलोत यांनी रविवारी रात्री सरकारमधील सर्व मंत्री आणि आमदारांना सरकारी निवासस्थानावर जेवणासाठी बोलावले. कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह खाचरियावास म्हणाले की, सरकारकडे पूर्ण बहुमत आहे. ते म्हणाले की, रात्रीच्या जेवणाला 115 आमदार उपस्थित होते. यादरम्यान काँग्रेसचे मुख्य सचेतक महेश जोशी यांनी काँग्रेस नेत्यांवर केलेल्या आयकर विभागाच्या छाप्याची टीका केली. भाजप सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचे ते म्हणाले. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser