आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajsthan; Randeep Surjewala Congress Rajasthan Political Crises, Latest News Live Update

राजस्थान:हॉर्स ट्रेडिंगच्या आरोपात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावतसह तिघांविरोधात गुन्हा दाखल; शेखावत यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी

जयपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एफआयआरमध्ये काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांचेही नाव, एसओजीने जैन यांना ताब्यात घेतले
  • काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणासे- जो टेप समोर आलाय, तो शेखावत, भंवरलाल आणि संजय जैन यांच्या चर्चेचा

राजस्थानात आमदारांच्या खरेदीप्रकरणाचा ऑडियो समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्याविरोधात स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) ने एपआयआर दाखल केली. यानंतर भाजप नेते संजय जैन यांना अटक करण्यात आली आहे. काँग्रेसचे मुख्य सचेतक महेश जोशी यांच्या तक्रारीवरुन एपआयआर दाखल करण्यात आली.

याबाबत शेखावत म्हणाले की, ऑडियो टेपमधील आवाज माझा नाही. मी कोणत्याची चौकशीसाठी तयार आहे. तर, राजस्थान भाजपाध्यक्ष सतीश पूनिया म्हणाले की, 'राज्यातील राजकारणात सुरू असलेले प्रकार अतिशय लाजीरवाणे आहेत. मुख्यमंत्र्यांचे ऑफिस फेक ऑडियो जारी करुन नेत्यांची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्रीय मंत्र्यांना या प्रकरणात ओढले जात आहे.'

भाजपची भूमिका संशयास्पद: काँग्रेस

काँग्रेसने शुक्रवारी फेअरमॉन्ट हॉटेलबाहेर पत्रकार परिषद केली. यात काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा उपस्थित होते. यावेळी सुरजेवाला म्हणाले की, भाजप 25-35 कोटी रुपयांमध्ये आमदारांची निष्ठा खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे. यात भाजप नेत्यांची भूमिका संशयास्पद आहे. काल आणि आज समोर आलेल्या ऑडियोमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, भाजप आमदार खरेदी करुन सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे.

सुरजेवाला म्हणाले की, कोरोनाशी सामना करण्याऐवजी, भाजप सत्ता मिळवण्याचत लागली आहे. मध्य प्रदेशातही भाजपने असेच केले. संपूर्ण देश कोरोनाशी सामना करत असताना, भाजप सत्ता पाडण्याचा प्रयत्नात होते. जे टेप समोर आले आहेत, त्यात केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, काँग्रेस आमदार भंवरलाल शर्मा आणि भाजपा नेते संजय जैन यांच्यात चर्चा झाल्याचे दिसत आहे. यात पैसे घेऊन सरकार पाडण्याबाबत बोलले जात आहे. 

केंद्रीय मंत्र्यांना अटक झाली पाहिजे

सुरजेवाला यांनी यावेळी व्हायरल ऑडियो टेपची तपासणी करण्याची मागणी केली. तसेच, या तपासात केंद्रीय मंत्री अडथळा आणण्याचा प्रयत्न आणू शकतात, म्हणून त्यांना अटक करण्याची मागणीदेखीलकेली.

काँग्रेसच्या दोन आमदारांची सदस्यता रद्द

या प्रकरणानंतर काँग्रेस आमदार भंवरलाल आणि माजी मंत्री विश्वेंद्र सिंह यांना पक्षाने प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे. या दोघांनाही पक्षाने कारणे दाखवा नोटिस दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...