आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही नाजूक आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांच्यासाठी पुढील 3 दिवस म्हणजे 72 तास अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. त्यातच राजू यांनी सकारात्मक संकेत दिल्याने त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे मानले जात आहे. डॉक्टरांचे एक पथक लखनऊ पीजीआयमधूनही पाठवण्यात आले आहे. गुरूवारी रात्री उशिरा त्यांच्या शरीरात हालचाल दिसून आली. दुसरीकडे, त्याची बहिण सुधा श्रीवास्तव यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना आयसीयूत राखी बांधून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली आहे. त्यांच्या शरिरात आता हालचाल सुरू झाली आहे. 48 तासांत प्रथमच गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास त्यांनी स्वतःचा पाय हलवला. ही माहिती कॉर्डियोलॉजिस्ट डॉ. संदीप सेठ यांनी दिली. सेठ यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांचे पथक राजूवर उपचार करत आहेत.
रात्री जवळपास 10 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी शिखा यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मोदींनी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याची कामना केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही सातत्याने या प्रकरणी अपडेट्स घेत आहेत.
डॉक्टर म्हणाले -पायाची हालचाल चांगले संकेत
राजू यांचे भाचे मयांक यांच्या माहितीनुसार, डॉक्टरांनी सांगितले आहे की, 48 तासांनंतर गुरुवारी रात्री राजू यांनी स्वतःच्या पायाची हालचाल केली. हे चांगले संकेत आहेत. एम्स दिल्लीनेही गुरूवारी रात्री एका निवेदनाद्वारे त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असल्याचे सांगितले आहे. राजूचे पीआरओ गर्विंत नारंग यांनी सांगितले की, त्यांना अद्याप व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचा मेंदू अद्याप योग्य प्रतिसाद देत नाही.
राजू यांना बुधवारी सकाळी वर्कआऊट करताना हृदयविकाराचा धक्का आला होता. त्यावेळी ते अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्या रक्त वाहिन्यांत अनेक ब्लॉकेजेस असल्याचे निष्पन्न झाले.
10 वर्षांत तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांची 10 वर्षांत तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी झाली आहे. पहिली अँजिओप्लास्टी 10 वर्षांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात झाली होती. त्यानंतर 7 वर्षांपूर्वी पुन्हा मुंबईच्याच लिलावती रुग्णालयात ते यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर बुधवारी डॉक्टरांनी त्यांची तिसऱ्यांदा अँजिओप्लास्टी केली आहे. पण अद्याप त्यांचा मेंदू प्रतिसाद देत नसल्यामुळे चिंता वाढली आहे.
बहिण राखी बांधण्यासाठी येत होती, रस्त्यातच घटनेची माहिती मिळाली
राजू श्रीवास्तव यांना 5 भावंड आहेत. त्यांची बहिण सुधा कानपूरच्या आचार्य नगरात राहते. ती 9 तारखेला सकाळी त्यांच्याकडे रक्षाबंधनासाठी जात होती. पण रस्त्यातच राजूची प्रकृती बिघडल्याचे त्यांना समजले.
सिंगर सोनू निगमने घेतली माहिती
गायक सोनू निगम यांनीही राजूच्या पत्नीशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. सोनू म्हणाले -ते सध्या परदेशात आहेत. भारतात पोहचोल्यानंतर सर्वप्रथम ते राजूंची भेट घेतील. कॉमेडियन जॉनी लिव्हर यांनीही राजूच्या प्रकृती स्वास्थ्याची माहिती घेतली आहे.
हर घर तिरंगा अभियानाला पाठिंबा
राजू श्रीवास्तव यांनी 9 ऑगस्ट रोजी आपल्या सोशल मीडिया पेजवर हर घर तिंरगा मोहिमेविषयी व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी आपल्या डीपीवर तिरंगा लावण्याची इच्छा व्यक्त केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.