आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मित्रहो, आपल्याकडे सध्या निकराची निवडणूक सुरू आहे. बंगालमध्येही निवडणुकीची धामधूम आहे. अशा या निवडणुकीच्या वातावरणात विवाह समारंभात भोजन करणाऱ्या एका व्यक्तीस विचारणा झाली... “पाहुणे, तुम्ही कुणाकडून, वर पक्षाचे की वधू पक्षाचे?’ तो म्हणाला, “आम्ही अपक्ष आहोत...’ मग काय, लोकांनी चांगलाच धुतला. अरे, पूर्वीची गोष्ट वेगळी होती. कोरोना-फोरोना भानगड नव्हती. लग्न समारंभात दीड-दोन हजार लोक येत. मग कोण कुणाला ओळखणार?... आता शंभर-पन्नास लोकांनाच परवानगी आहे. यात बाहेरचा कुणी आला की लगेच नजरेत येतो.
असो. आता आपल्या शहराचा विचार करू... लोक म्हणतात आपल्या शहरात खड्डेच खड्डे आहेत... अरे, या खड्ड्यांचे फायदे पाहा ना! आमचा मनोहर नामक मित्र आहे. त्याची गाडी एकदा खड्ड्यात फसली... शेजारून दुचाकीवर त्याचा एक जुना मित्र मिश्राजी जात होते... त्यांनी गाडी थांबवली आणि मनोहरच्या गाडीचे फसलेले चाक काढले. कितीतरी वर्षांनी दोघांची भेट झाली होती. मग कोपऱ्यावर चहापाणी झाले, क्षेमकुशल विचारले. यातून कळाले की मिश्राजींचा मुलगा रेल्वेत अधिकारी झालाय. त्यांनी मनोहरशी आपल्या मुलीच्या स्थळाबद्दल विचारणा केली... रस्त्यावर या एका कोपऱ्यातच १० रुपयांच्या चहामध्ये स्थळ जुळून आले.
चहावरून लक्षात आले... आमचा एक मित्र आहे अन्नू अवस्थी... एकदा मी त्याला भेटायला गेलो. त्याने बंदूक आणली आणि हवेत दोन गोळ्या झाडल्या. मी विचारले, ‘हे काय?’ अन्नू म्हणाला, “काही नाही, चहावाल्याला दोन चहा सांगितले...’ तशी या चिनी लोकांच्या घोटाळ्यामुळे जगाचीच सध्या फरफट सुरू आहे. वर्ष झालं लोक मास्क घालून फिरताहेत. हे चिनी लोक सर्वांचे नाक त्यांच्यासारखे बसल्याशिवाय थांबणार नाहीत. अर्थात, लॉकडाऊनदरम्यान सर्वाधिक काळ पती-पत्नीला एकत्र ठेवणारे मोदीजी पहिले पंतप्रधान आहेत!
असे ऐकिवात आहे की, कोरोना म्हणे पुन्हा सगळीकडेच भडकलाय. लोकहो, काळजी घ्या. मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि सतत हात स्वच्छ करत राहा... नाहीतरी लक्षात ठेवा, हा मार्च महिना आहे. वर यमराजाचेही क्लोजिंग सुरू आहे. मार्च संपण्याआधी त्यांनाही टार्गेट पूर्ण करायचे आहे... आणि शेवटी एकच सांगेन - जिसकी मस्ती जिंदा है...उसकी हस्ती जिंदा है.. वरना इन्सान जबरदस्ती जिंदा है...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.