आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेच्या दोन्ही सभागृहांत विरोधकांचा गदारोळ:राज्यसभा दोनदा तहकूब; इंधन दरवाढीविरोधात विरोधकांचे लोकसभेतून वॉकआउट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील विरोधकांचा गदारोळ अव्याहत सुरू आहे. गुरुवारी कामकाजाला सुरुवात होताच अवघ्या 15 मिनिटांत दोनवेळा राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. काँग्रेस सदस्य मनीष तिवारी यांनी भारत-चीन सीमावादावर चर्चा करण्यासाठी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दाखल केला. पण त्यावर चर्चा झाली नाही.

विरोधकांचे लोकसभेतून वॉकआउट

पेट्रोलच्या वाढत्या दरांवर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वात विरोधी बाकावरील सर्वच सदस्यांनी लोकसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

बिहारमधील दारुकांडावर राज्यसभेत गदारोळ

बिहारमध्ये विषारी दारूचे सेवन केल्यामुळे झालेल्या मृत्युंप्रकरणी गुरुवारी राज्यसभेत तीव्र गदारोळ झाला. यामुळे राज्यसभेचे कामकाज 15-15 मिनिटांसाठी दोनवेळा तहकूब करावे लागले.

संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस खासदार प्रमोत तिवारी यांनी राजकीय प्रतिस्पर्धी व इतरांविरोधात CBI-ED व अन्य सराकरी यंत्रणांचा गैरवापर करण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी राज्यसबेत नियम 267 अंतर्गत नोटीस बजावली.

दुसरीकडे, भाजप खासदार बिप्लव कुमार देव यांनी त्रिपुरा-बांगलादेश सीमेवर बॉर्डर हाट (व्यापार पोस्ट) पुन्हा सुरू करण्यावर जोर देत राज्यसभेत शून्य प्रहर नोटीस दिली. सीपीआय खासदार संदोष कुमार पी यांनीही रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सूट देण्याच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. त्यांनीही या प्रकरणी नोटीस दिली.

मोदी सरकारच्या 'लाल डोळ्यांवर' चिनी चश्मा -खरगे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चीनसोबतच्या संघर्षाच्या मुद्यावर केंद्राला घेरले. त्यांनी ट्विट केले -असे वाटते की मोदी सरकारच्या लाल डोळ्यांवर चिनी चश्मा घालण्यात आला आहे. भारतीय संसदेत चीनविरोधात बोलण्याची परवानगी नाही काय?

काँग्रेस खासदाराचे पत्र

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी लोकसभेच्या सरचिटणीसांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणाले - भारत-चीन लष्करांत 2020 गलवान व यांगत्सेमध्ये झालेल्या चकमकीसंबंधी मी अनेक प्रश्न उपस्थित केले. ऑगस्ट 2020 मध्ये पूर्व लडाखच्या रिनचेन ला मध्य झालेल्या चकमकीनंतर दोन्ही लष्करांतील ही पहिलीच प्रत्यक्ष चकमक आहे.

ते म्हणाले - असे का घडत आहे यासंबंधी प्रश्न विचारणे गरजेचे आहे. चीनला काय हवे आहे? या हल्ल्यांमुळे भारताने काही भूभाग गमावला आहे काय, असे असेल तर सरकार ते पुन्हा मिळवण्यासाठी कोणती योजना आखत आहे? मी सरकारला हे प्रकरण पूर्ण गांभियार्याने घेऊन चीनसोबतच्या सीमावादावर संसदेत विस्तृत चर्चा करण्याची विनंती करतो. मी हे प्रकरण उपस्थित करण्याची विनंती करतो.

केंद्र 16 विधेयक सादर करणार

संसदेचे विद्यमान अधिवेशन 17 दिवसांपर्यंत चालणार आहे. त्यात एकूण 16 विधेयक सादर केले जातील. पहिल्या दिवशी राज्यसभेत वन्यजीवन संरक्षण (दुरुस्ती) विधेयक 2022वर चर्चा झाली. तर लोकसभेत लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी झाली. राज्यसभेच्या 258 व्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासाठीही विशेष राहिला. कारण, राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांचा हा पहिलाच दिवस होता.

बातम्या आणखी आहेत...