आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिवेशन:राज्यसभेत 10 दिवसांत 25 विधेयके मंजूर; विरोधी पक्षांनी घातले आता राष्ट्रपतींना साकडे

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेतकऱ्यांचा 25 रोजी देशभर ‘चक्का जाम’चा इशारा

राज्यसभेचे कामकाज बुधवारी अनिश्चित काळासाठी संस्थगित झाले. हे अधिवेशन १ ऑक्टोबरपर्यंत चालणार होेते, पण कोरोनामुळे ८ दिवस आधीच सूप वाजले. अधिवेशनाचा कालावधी कमी असूनही त्यात २५ विधेयके मंजूर झाली किंवा लोकसभेकडे परत पाठवण्यात आली. त्यापैकी १५ विधेयके तर गेल्या दोन दिवसांतच मंजूर झाली. दुसरीकडे, कृषी विधेयके आणि खासदारांच्या शिक्षेविरोधात विरोधकांनी तिसऱ्या दिवशीही राज्यसभेच्या कामकाजावर बहिष्कार घातला. बुधवारी संसद भवन परिसरात मोर्चा काढला आणि घोषणा दिल्या.

शेतकऱ्यांचा २५ रोजी देशभर ‘चक्का जाम’चा इशारा

कृषी विधेयकांच्या विरोधात संपूर्ण देशात २५ सप्टेंबरला ‘चक्का जाम’ केला जाईल, असा इशारा भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते व उत्तर प्रदेशचे शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी दिला. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरातील संघटना त्यात सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...