आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rajya Sabha High Drama; Mamata Banerjee | TMC Party MP Snatches Pegasus Statement From IT Minister Ashwini Vaishnaw

पेगासस प्रकरणांवरुन राज्यसभेत रणकंदन:​​​​​​​तृणमूल खासदाराने आयटी मंत्र्यांच्या हातातून निवेदन हिसकावून फाडले, मंत्र्यांना आपले बोलणेही करु दिले नाही पूर्ण

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • RJD ने म्हटले- मंत्र्यांचा व्यवहार दुर्भाग्यपूर्ण

पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच आहे. गुरुवारी, विरोधी पक्षातील सदस्यांनी पेगासस हेरगिरी घोटाळ्यासह अनेक विषयांवर निदर्शने केली. पेगासस प्रकरणावरून राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांना आपले मतही मांडता आले नाही आणि त्यांना त्यांचे भाषण लवकर आटोपून घ्यावे लागले. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर निवदेन हिसकावून घेण्यापर्यंत हे प्रकरण गेले.

आयटी मंत्री जेव्हा पेगासस विषयावर आपले मत मांडण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे तृणमूलचे खासदार शांतनु सेन यांनी आयटी मंत्र्यांच्या हातातील निवेदन पत्रक हिसकावून ते फाडले आणि हवेत फेकले. यादरम्यान, गोंधळ सुरू असताना आयटी मंत्री सतत बोलत राहिले, परंतु त्यांना त्यांचे मत पूर्णपणे मांडता आले नाही. यानंतर भाजप आणि तृणमूलचे खासदार यांच्यात जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हाताळण्यासाठी मार्शल बोलवावे लागले.

त्यानंतर राज्यसभा उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली. ही तिसरी वेळ होती जेव्हा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. यापूर्वी सकाळी कारवाई सुरू परंतु गोंधळामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब करावी लागली होती. दुसरीकडे लोकसभेची कार्यवाही देखील आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

RJD ने म्हटले- मंत्र्यांचा व्यवहार दुर्भाग्यपूर्ण
राज्यसभेतील घटनेविषयी आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणतात की, गदारोळादरम्यान आयटी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने निवेदन दिले त्यावरून सरकारला केवळ मुद्द्यांची खिल्ली उडवायची आहे असे दिसते. मंत्र्यांची ही वृत्ती दुर्दैवी होती.

बातम्या आणखी आहेत...