आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:राज्यसभेचे खासदार अमरसिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन, सहा महिन्यांपासून मूत्रपिंडावर सुरू होते उपचार

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेचे खासदार अमर सिंह यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. ते मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर सहा महिन्यांपासून उपचार सुरू होते. अमरसिंह उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार होते. 5 जुलै, 2016 रोजी त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व स्वीकारले होते. एकेकाळी त्यांना उत्तर प्रदेशातील उच्च नेत्यांपैकी एक मानले जात असे.

अमर सिंह यांचे अमिताभ बच्चन यांच्याशी होते जवळचे संबंध

एकेकाळी अमिताभ बच्चन यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. मात्र नंतर हे संबंध बिघडले. यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात अमिताभ यांची माफी देखील मागितली होती. अमर सिंह यांचा जन्म 2 जानेवारी 1956 रोजी उत्तर प्रदेशमधील अलिगड येथे झाला. त्यांना दोन मुली आहेत.

अमर सिंग यांना दोनदा सपातून काढले होते

अमर सिंह यांना अखिलेश यादव यांनी 2017 मध्ये पक्षातून काढले होते. याआधी त्यांना 2010 मध्ये पक्षातून काढण्यात आले होते.

अमर सिंह यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात 1996 मध्ये झाली होती. राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली होती. केंद्रात यूपीएचे सरकार असताना अमर सिंह यांचे नाव चर्चेत असायचे. मुलायम सिंह यादव समाजवादी पक्षाचे प्रमुख असताना अमर सिंह राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते.

मार्च महिन्यात पसरली होती निधनाची अफवा

मार्च महिन्यात परदेशात उपचार सुरू असतानाच अमर सिंह यांच्या निधनाची अफवा मीडियात पसरली होती. त्यावर त्यांनी 'टायगर अभी जिंदा है' असा व्हिडिओ मेसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. 'आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशही आणि होश बाकी आहे. यमराजने मला बोलावल्याची माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवली. असे काही झालेले नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत', असे अमर सिंह यांनी या व्हिडिओत म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...