आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rajya Sabha Passes Epidemic Amendment Bill 2020, Central Government Says 97 Workers Lost Their Lives In Labor Special Train

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महत्त्वाचा निर्णय:राज्यसभेत महामारी संशोधन विधेयक 2020 पास, केंद्र सरकारने सांगितले- श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये 97 मजुरांनी गमावला होता जीव

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्र सरकारने 123 वर्ष जुन्या कायद्यात बदल केला आहे.

राज्यसभेत शनिवारी महामारी रोग विधेयक (संशोधक) विधेयक 2020 पास झाले. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संसदेत हे विधेयक पास केले. या विधेयकात महामारीदरम्यान देशात डॉक्टर्स, नर्स, आशा कार्यकर्त्यांची सुरक्षा, तर हल्ला करणाऱ्यावर शिक्षा देण्याची तरतूद आहे. केंद्र सरकारने 123 वर्ष जुन्या कायद्यात बदल केला आहे. याअंतर्गत डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्यांना जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. हल्लेखोरांना 50 हजार ते 2 लाख दंड करण्याची तरतूद आहे. याशिवाय 3 महिन्यांपासून 5 वर्षाची शिक्षा देखील होऊ शकते. गंभीर दुखापत झाल्यास जास्तीत जास्त 7 वर्षे शिक्षा होऊ शकते. हा अजामीनपात्र गुन्हा असेल.

दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, लॉकडाऊन दरम्यान चालवल्या जाणार्‍या विशेष गाड्यांच्या प्रवासादरम्यान 97 प्रवासी मजूर मरण पावले. गोयल म्हणाले की, राज्य सरकारांकडून ही आकडेवारी प्राप्त झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...