आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यसभा निवडणूक:भाजपचा 10, काँग्रेसचा 5 जागी विजय, राज्यसभेत भाजपचे संख्याबळ 75 वरून 85 वर

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मध्य प्रदेशात भाजपचे ज्योतिदरादित्य शिंदे, सुमेरसिंह सोलंकी तर काँग्रेसचे दिग्विजयसिंह जिंकले.

देशात ९ राज्यांतील २३ राज्यसभा जागांवर शुक्रवारी निवडणूक झाली. भाजपला १० तर काँग्रेसला ५ जागी विजय मिळाला. गुजरातेत याही वेळी राजकीय वातावरण तापले. चारपैकी ३ जागी भाजप विजयी तर काँग्रेसला दोनपैकी एका जागेवर पराभवाचा सामना करावा लागला. दोन मते रद्द करण्याच्या काँग्रेसच्या मागणीमुळे मतगणना व निकालांना विलंब झाला. निवडणूक आयोगाने काँग्रेसचे आक्षेप फेटाळले.

दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपचे ज्योतिदरादित्य शिंदे, सुमेरसिंह सोलंकी तर काँग्रेसचे दिग्विजयसिंह जिंकले. आता राज्यसभेत भाजपचे संख्याबळ ७५ वरून ८५ वर गेले आहे. काँग्रेसच्या दोन जागा घटल्याने त्यांचा आकडा ३७ वर आला आहे. सभागृहात आता एनडीएच्या एकूण सदस्यांची संख्या १०३ झाली. यूपीएकडे ५९ सदस्य उरले आहेत.

बातम्या आणखी आहेत...