आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • RajyaSabha Oath Taking Ceremony News Update; Rajya Sabha Election 2020, Covid 19 Situation, Rajya Sabha

शपथविधी सोहळा:राज्यसभेच्या चेंबरमध्ये 22 जुलैला होईल नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी सोहळा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 22 जुलै रोजी राज्यसभेत नवनिर्वाचिक राज्यसभा खासदारांच्या शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सूत्रांच्या हवाल्याने न्यूज एजेंसीने सांगितले की, राज्यसभेच्या चेंबरमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळण्यासाठी 61 सदस्यांना पत्र पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण लक्षात घेऊन, या कार्यक्रमादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्यात येईल.

सूत्रांनी सांगितल्यानुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करता यावे, यासाठी पहिल्यांदाच शपथविधी सोहळा सभागृहाच्या चेंबरमध्ये इंटर-सेशन पीरियडदरम्यान पार पडेल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 20 राज्यातील 61 सदस्य राज्यसभेवर निवडूण गेले होते.

शिंदे, दिग्विजय, वेणुगोपालसारखे मोठे नेते निवडूण गेले

या निवडणुकीत मोठ्या चेहऱ्यांबाबत बोलायचे झाल्यास, मध्यप्रदेशातून भाजपचे ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे दिग्विजय सिंह विजयी झाले. हे दोन्ही नेते, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. तसेच, काँग्रेसचे संघटना महासचिव केसी वेणुगोपाल राजस्थानमधून विजयी झाले होते.

19 जागांसाठी जूनमध्ये झाली होती निवडणूक

राज्यसभेच्या 19 जागांसाठी 19 जूनला झालेल्या निवडणूकीत भाजपला 8 आणि काँग्रेसला 4  जागांवर विजय मिळाला होता. मागच्या वेळेस या 19 जागांपेकी भाजपला 9 आणि काँग्रेसला 6 जागा मिळाल्या होत्या. म्हणजे, यावेळी भाजपला 1 आणि काँग्रेसला 2 जागांवर पराभवाचा सामना करावा लागला.