आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
26 जानेवारीला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये झालेल्या हिंसाचाराविषयी भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांच्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. रॅलीच्या पूर्वी टिकैत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये टिकैत म्हणत होते की, लाठ्या-काठ्याही सोबत ठेवा आपल्या... झेंडा लावण्यासाठी, समजून घ्या सर्व गोष्ट.
आता प्रश्न उपस्थित होत आहेत की, टिकैत यांच्या सांगण्यावरुनच आंदोलक लाठ्या घेऊन पोहोचले होते. यावर स्पष्टीकरण देताना टिकैत बुधवारी म्हणाले, 'हो मी म्हणालो होतो की, काठ्या घेऊन या. पण मला विना काठीचा एकही झेंडा दिसला तर मी माझी चूक मान्य करेल'
व्हिडिओमध्ये काय म्हटले होते
टिकैत म्हणाले होते, 'सरकार जास्त कठोर आहे. तुम्ही झेंडाही घेऊन या. लाठी-काठीही सोपत ठेवा आपली... झेंडा लावण्यासाठी. सर्व काही समजून घ्या. ठीक आहे. लावा झेंडा... तिरंगाही लावा आणि तसाही लावा त्यावर आणि आता खूप झाले... तुम्ही या फक्त... या तुम्ही जमीन वाचवण्यासाठी, कारण आपली जमीन आता राहणार नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.