आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rakeshwar Singh Manhas | Chhattisgarh Naxal Attack Update; CRPF Jawan Rakeshwar Singh Manhas Released By Naxalites In Bijapur

छत्तीसगडमधून दिलासा देणारी बातमी:5 दिवसानंतर नक्षलवाद्यांच्या तावडीतून जवान राकेश्वर सिंह यांची सुटका

रायपूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राकेश्वर यांचा सुटका झाल्यानंतरचा पहिला फोटो. - Divya Marathi
राकेश्वर यांचा सुटका झाल्यानंतरचा पहिला फोटो.
  • नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

3 एप्रिलला जोनागुडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर बेपत्ता झालेले जवान राकेश्वर सिंह नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडले होते. आता पाच दिवसानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना सोडून दिले आहे.

राकेश्वर यांच्या सुटकेनंतर पत्नी मीनू यांना आनंद अनावर झाला. त्या म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस आहे. त्यांच्या परत येण्यावर मला पूर्ण विश्वास होता. मी सरकारचे आभार मानते. तसेच, राकेश्वर यांची आई कुंती देवी म्हणाल्या की, माझ्या मुलाला सोडणाऱ्यांचे मी आभार मानते. देवाचेही आभार मानते

नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार

नक्षलवाद्यांशी चर्चा करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांना पाठवण्यात आले होते. यात पद्मश्री धरमपाल सैनी, गोंडवाना समन्वय समितीचे अध्यक्ष तेलम बोरैया आणि त्यांचे काही साथीदार सामील आहेत.

चकमकीत 23 जवान शहीद

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये 3 एप्रिल रोजी चकमक झाली होती. त्या घटनेत 23 जवान शहीद झाले होते, तर पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाला होता. यावेळी नक्षलवाद्यांनी CRPF चे कोबरा कमांडर राकेश्वर सिंह यांचे अपहरण केले होते. यानंतर माओवादी प्रवक्ता विकल्पने मंगळवारी प्रेस नोट जारी करुन म्हटले होते की, सरकारने बातचीतसाठी मध्यस्थींची नावे सांगावी, यानंतरच रामेश्वर यांना सोडण्यात येईल.

सरकारने मध्यस्थींची नावे सार्वजनिक केली नाही

नक्षलवाद्यांच्या मागणीनंतर सरकारने मध्यस्थींची नावे जाहीर केली की नाही, याबाबत अद्याप काही माहिती नाही. अद्याप सरकारकडून मध्यस्थींची नावे सार्वजनिक करण्यात आलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...