आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir Bhoomi Pujan Updates: Shankaracharya Swaroopanand Saraswati Raised Questions About Auspicious Time Of Temple Construction

राम मंदिर:भूमिपूजनाच्या मुहूर्तावर शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती नाराज, म्हणाले- 5 ऑगस्टला ठरलेली वेळ अशुभ आहे

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येत येत्या 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. परंतू, आता भूमिपूजनाच्या अशुभ तिथीवरुन शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शंकराचार्यांनी मंदिराच्या भूमिपूजनाची वेळ अशुभ असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही राम भक्त आहोत. मंदिर कोणीही बांधले तरी, आम्हाला खुशी होईल पण शुभ तिथी आणि शुभ मुहूर्त असायला हवा. स्वरूपानंद म्हणाले की, जनतेच्या पैशाने मंदिर बांधले जात असेल, तर जनतेचे मत विचारात घ्यायला हवे.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन संतांमध्ये लहान-मोठे वाद होताना दिसत आहेत. अयोध्येच्या संत समाजाने स्वरूपानंदजी यांना आव्हानही दिले, शास्त्रार्थ ज्ञान दाखावायचे असल्यास 5 ऑगस्टला येऊन सिद्ध करा, असे म्हटले आहे. शंकराचार्य म्हणाले की, मंदिरासाठी अनेक वर्षे आंदोलन झाहे, अखेर भूमिपूजनाची वेळ आली, पण तिथी आणि मुहूर्त चुकीचा ठरवला. 

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, राम मंदिराची रचना कंबोडियामधील अंकोरवाट मंदिराच्या धर्तीवर व्हायला हवे. ते म्हणाले की, चालुक्य राजांचे राज्य तिथे होते. 11 व्या शतकात या राजांनी तिथे भव्य मंदिराची स्थापना केली होती. मंदिर एकदाच बांधले जाणार आहे, त्यामुळे याची भव्यता आणि रचना ठीक असायला हवी.