आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir | In Three and a half Years, The Temple Will Be Built With A Golden Urn, The Height Of The Temple Has Been Increased By 33 Feet And The Pillars Will Be At 300

राम मंदिर:साडेतीन वर्षांत सुवर्णकलशजडित मंदिर साकारेल, मंदिराची उंची 33 फुटांनी वाढवली असून स्तंभ 300 वर असतील

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घुमटही तीनवरून पाच करण्यात आले

श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने मंगळवारी ट्विट करून भव्य श्रीराम मंदिराची नवी थ्री-डी इमेज जारी केली. मंदिराच्या सर्व शिखर कलशांना सोन्याने मढवले जाईल. मंदिर प्रत्यक्षात येण्यासाठी साडेतीन वर्षे लागतील. मंदिर तीन मजली असेल. मंदिराचे शिखर १६१ फूट उंच असेल. घुमटांची संख्या ३ वरून पाच झाली आहे. मंदिराचे वास्तुकार निखिल सोमपुरा यांच्या मते, नव्या मॉडेलमध्ये उंची, आकार, क्षेत्रफळ व पायाभूत संरचनेच्या दृष्टीने अनेक बदल करण्यात आले आहेत.

मंदिराच्या पायासाठी खोदकाम केले जाईल. ते २० ते २५ फूट खोल असू शकते. दिव्यांगांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे.

घुमटही तीनवरून पाच करण्यात आले

पहिल्यांदाच घुमटांच्या आतील भाग दर्शवण्यात आला आहे. राम मंदिराच्या पाचही घुमटांखालील चार भाग असतील. त्यात सिंहद्वार, नृत्यमंडप, रंगमंडप असेल. येथे भाविकांना विविध कार्यक्रम घेता येतील.

बातम्या आणखी आहेत...