आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir Photos Update | Ayodhya Ram Mandir Model Photos Released Ahead Janmabhoomi Pujan On August 5

8 फोटोंमध्ये पाहा कसे दिसेल राम मंदिर:जन्मभूमी ट्रस्टने राम मंदिराचे मॉडल फोटो जारी केले, अयोध्येच्या काना कोपऱ्यातून दिसेल मंदिराचे शिखर

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिर 70 एकरावर बनेल, तीन एकरात मंदिर आणि कॉरिडोर असेल
  • 67 एकरात म्यूजियम, सीता, लक्ष्मण, भरत आणि भगवान गणेशाचे मंदिर असेल
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 1989 मध्ये राम मंदिराचे मॉडल बनवले होते

अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान रामाच्या मंदिराचे भूमिपूजन करणार आहेत. यापूर्वी मंगळवारी(दित.4) राम मंदिराच्या मॉडलचे काही फोटो समोर आले आङेत. 161 फूट उंच राम मंदिरात पाच मंडप आणि एक मुख्य शिखर आहे. अयोध्या नगरीच्या काना कोपऱ्यातून मंदिराचे शिखर दिसेल, असा दावा करण्यात येत आहे. 1989 मध्ये या मंदिराचे मॉडल तयार करण्यात आले होते. यात आता काही बदल करण्यात आले आहेत. हे मंदिर पुढील तीन-चार वर्षात तयार होईल.

राम मंदिराचा नक्षा तयार करणारे चीफ आर्किटेक्ट सोमपुरा यांचे पूत्र निखिल सोमपुरा यांनी सांगितले की, मंदिर 70 एकरात तयार होईल. पण, मंदिर 3 एकरात असेल. इतर 65-67 एकर जमिनीवर मंदिराचा विस्तार केला जाईल.

एका अंदाजानुसार, मंदिरात एका दिवसात एक लाख भाविक येऊ शकतील. हे बाब लक्षात घेऊन मंदिराच्या नक्षात बदल करण्यात आले आहेत.

पहिल्या मंदिरात दोन घुमट होते. मूळ मॉडेलमध्ये बदल न करता यात पाच घुमट करण्यात आले आहेत. गर्भगृहपासून 200 फूट खोल मातीचे परीक्षण केले होते. ज्या ठिकाणी माती कमकुवत असेल, तेथून मंदिराच्या आधारासाठी प्लॅटफॉर्म बनवला जाईल.

मंदिरात सिंहद्वार, रंग मंडप, नृत्य मंडल, पुजा कक्ष आणि गर्भगृहावर पाच घुमट असतील. शिलापूजननंत मशीनने पाया खोदण्याचे काम सुरू होईल. मंदिरात संगमरवरी फरशी बसवली जाईल. मंदिराला 318 पिलर असतील.

संपूर्ण मंदिर बांधण्यासाठी अंदाजे 1.75 लाख घन फूट दगडाची गरज पडेल. कारसेवकपुरम्मध्ये मंदिराठी दगडांचे नक्षीकाम पूर्ण झाले आहे. मंदिराचा पाया तयार करण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा वेळ लागेल.

हे नागर शैलीत तयार झालेले अष्टकोणीय मंदिर असेल. यात भगवान रामाच्या मूर्तीसोबत राम दरबार असेल. मुख्य मंदिराच्या मागे आणि पुढे सीता, लक्ष्मण, भरत आणि भगवान गणेशाचे मंदिर असेल.

मंदिर निर्माणासाठी राम जन्मभूमी न्यास आणि विश्व हिन्दू परिषदेकडून दगडांना कोरण्याचे काम 1990 मध्येच सुरू झाले होते.

70 एकराच्या परिसरातील तीन एकरात मंदिर आणि कॉरिडोअर असेल. याशिवाय 67 एकरात म्यूजियम, माता सीता, लक्ष्मण, भरत आणि भगवान गणेशाचे मंदिर असेल.

बातम्या आणखी आहेत...