आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Ram Mandir | PM Narendra Modi Full Speech At Ram Mandir Bhumi Pujan In Ayodhya News

अयोध्येतून मोदींचे संबोधन:पंतप्रधान म्हणाले - माझे येणे स्वाभाविक होते, कारण राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम; शतकानुशतके केलेली प्रतीक्षा आज संपत आहे

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल - मोदी

अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित केले. जय श्रीरामचा नारा देऊन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले की, येथे येणे स्वाभाविक होते. कारण राम काज कीजे बिना मोहि कहां विश्राम. भारत आज भगवान भास्करच्या सानिध्यात शरयू किनारी एक सुवर्ण अध्याय रचत आहे. सोमनाथ पासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयापासून सारनाथपर्यंत, अमृतसरपासून पाटणा साहिबपर्यंत, लक्षद्वीपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आहे.

काय म्हणाले मोदी

 • राम जन्मभूमी ट्रस्टने मला येथे आमंत्रित करुन या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे. यासाठी मी त्यांचे आभार मानतो. भारत एक सुवर्ण इतिहास रचत आहे. आज पूर्ण भारत राममय आहे. पूर्ण देश रोमांचित झाला आहे. प्रत्येक मनात दीपमय झालंय. आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. शतकांची प्रतिक्षा आज संपत आहे. कोट्यवधी लोकांना आज विश्वासच बसत नसेल की आपण जीवंतपणीच हा क्षण पाहिला.
 • इराण आणि चीनमध्ये देखील रामाचे प्रसंगांचे किंवा राम कथांचे वर्णन मिळेल. श्रीलंकेत जानकीहरण म्हणून रामायण सांगितले जाते. अशाचप्रकारे जगातील कितीतरी देशात राम कोणत्या ना कोणत्या रुपात अस्तित्वात आहेत
 • तुलसीचे राम सगुण राम, तर नानक यांचे निर्गुण राम आहेत. भगवान बुद्ध यांचाही रामांशी संबंध आहे. राम सर्व ठिकाणी आहेत, राम सर्वांचे आहेत. राम भारताच्या अनेकतेत एकतेचं प्रतिक आहेत. जगातील अनेक देश रामाचे नाव घेतात. ते देश श्रीरामांशी स्वतःला जोडून घेतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात आजही राम पूजनीय आहेत.
 • भारताच्या श्रद्धेची ही शक्ती संपूर्ण जगासाठी अभ्यासाचा विषय आहे. सत्यावर अढळ राहणे हेच श्रीरामांच्या चरित्राचा केंद्रबिंदू आहे. म्हणूनच हजारो वर्षांपासून श्रीराम आपल्यासाठी आशेचा केंद्र आहे. श्रीरामांचे व्यक्तित्व युगानुयुगे प्रेरणा देत राहील. त्यांची गरिबांवर विशेष दृष्टी आहे. जीवनाचा असा एकही पैलू नाही जेथे राम प्रेरणा देत नसतील. भारताची एकही अशी भावना नाही जेथे प्रभू राम नाहीत.
 • ज्या पद्धतीने मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, दलित, वंचित अशा समाजातील प्रत्येक घटकांनी महात्मा गांधींना सहयोग केला, तसेच आज देशातील प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराच्या निर्माणाचे काम सुरु झाले आहे. जसा रामसेतू तयार झाला, तसाच गावागावातून आलेल्या विटा, माती, नद्याचं पाणी येथे प्रेरणा देत आहे. ही अमोघ शक्ती आहे. हे न भूतो न भविष्यती आहे.
 • कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळे भूमिपूजनाच्या या कार्यक्रमाला अनेक मर्यादा आल्या आहेत. श्रीरामांच्या कामात जी मर्यादा दाखवली पाहिजे तीच मर्यादा आज आपण दाखवून दिली. अशीच मर्यादा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दाखवली होती. तेव्हा देखील देशाने सर्वांच्या भावनांचा आदर करत मर्यादा दाखवली होती. या मंदिरासोबत नवा इतिहासच रचला जात नाही, तर इतिहासाची पुनरावृत्ती देखील होत आहे.
 • हनुमानजींच्या आशिर्वादाने राम मंदिराच्या भूमिपूजनाला सुरुवात झाली. हे मंदिर आपले आधुनिक प्रतिक बनेल. शाश्वत आस्थेचे, राष्ट्रीय भावनेचे प्रतिक बनेल. हे मंदिर येणाऱ्या पिढ्यांना आस्था, श्रद्धा आणि संकल्पाची प्रेरणा देईल. या मंदिरामुळे अयोध्येची प्रतिमाच नाही बदलणार, तर येथील अर्थशास्त्रही बदलेल. प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तयार होतील. पूर्ण जगातील लोक प्रभू राम आणि माता जानकीचे दर्शन करायला येतील.
 • राम मंदिरासाठी सुरु असलेल्या आंदोलनात अर्पण आणि तर्पणही होता, संघर्षही होता आणि संकल्पही होता. या आंदोलनात सहभागी झालेल्यांना मी 130 कोटी भारतीयांच्या वतीने नमन करतो. यात सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती हा सोहळा पाहत आहे. राम आपल्या मनात एकरुप झाले आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणेसाठी आपण भगवान रामाकडेच पाहतो.
 • इमारती नष्ट झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. अस्तित्व मिटवण्याचे अनेक प्रयत्न झाले. मात्र, राम आजही आपल्या मनात आहेत. श्रीराम भारताची मर्यादा आहेत, मर्यादा पुरुषोत्तम आहेत.
 • अनेक शतके तंबूत राहिलेल्या रामलल्लांसाठी एक भव्य मंदिर बांधले जात आहे. रामजन्मभूमी आज मुक्त झाली आहे. आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्यावेळी आपले सर्वस्व अर्पण केले होते. गुलामगिरीच्या काळात स्वातंत्र्यासाठी आंदोलन झाले नाही असे एकही ठिकाण नव्हते. 15 ऑगस्टचा दिवस त्या लाखो बलिदानाचे प्रतिक आहे. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी अनेक शतके, अनेक पिढ्यांनी अविरत, एकनिष्ठ प्रयत्न केलेत. आजचा दिवस त्या संकल्पाचे प्रतिक आहे.