आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ram Mandir | Prime Minister Modi's Violation Of The Oath Of The Constitution, Owaisi's Criticism Of The Ram Mandir Bhumi Pujan Ceremony

अयोध्या राम मंदिर:... हे तर पंतप्रधान मोदींकडून संविधानाच्या शपथेचे उल्लंघन, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावरून ओवेसींची टीका

नवी दिल्ली/हैदराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अयोध्येत 400 वर्षांपर्यंत मशीद होती, हे आपण विसरू शकत नाही- ओवेसी

अयोध्येत ५ ऑगस्टला होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीवरून राजकारण तापत आहे. एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनात जाण्याला संविधानाच्या शपथेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून नव्हे, तर वैयक्तिक पातळीवर या कार्यक्रमात सहभागी व्हावे. देशाच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणे पंतप्रधानांनाही धार्मिक स्वातंत्र्य आहे.

ओवेसींनी ट्विट करताना म्हटले आहे की, पंतप्रधान म्हणून भूमिपूजनात सहभागी होणे संविधानाच्या शपथेचे उल्लंघन आहे. धर्मनिरपेक्षता भारतीय संविधानाचा मूलभूत पाया आहे. अयोध्येत ४०० वर्षांपर्यंत मशीद होती, हे आपण विसरू शकत नाही. १९९२ मध्ये ती पाडली. सरकारला कोणताही धर्म नसतो. या कार्यक्रमात पंतप्रधानांची उपस्थिती जखमा जिवंत करेल, असेही त्यांनी म्हटले आहे.