आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी यांना सुनावले:1 जानेवारी 2024 रोजी राम मंदिर तयार असेल, अशा शब्दांमध्ये शहा यांनी राहुल यांना सुनावले

त्रिपुरा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येत भव्य राम मंदिर १ जानेवारी २०२४ रोजी तयार असेल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. गुरुवारी एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी राहुल गांधी यांचा समाचार घेतला.

ते म्हणाले, सन २०१९ मध्ये मी भाजप अध्यक्ष होतो आणि राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या वेळी राहुल गांधी प्रचारसभांमध्य्े रोज म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, पर तारीख नहीं बताएंगे’. त्यामुळे राहुल गांधी नीट लक्षपूर्वक ऐका १ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत प्रभु श्री रामाचे भव्य आणि गगनचुंबी मंदिर तयार असेल, अशा शब्दांमध्ये शहा यांनी राहुल यांना सुनावले.

राम मंदिराचा मुद्दा काँग्रेसने न्यायालयात दीर्घकाळ प्रलंबित ठेवला अशी टीका करून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन करून मंदिर उभारण्यास सुरुवात केली, असे शहा म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...