आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Ram Nath Kovind Health Condition Update | President Kovind Admitted To Army Hospital After Chest Discomfort

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रपतींची प्रकृती खालावली:छातीत दुखत असल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद आर्मी रुग्णालयात दाखल; प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने केले स्पष्ट

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या दिल्लीच्या आरएंडआर आर्मी हॉस्पीटलमध्ये डॉक्टरांच्या देखरखीखाली उपचार घेत आहे

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी छातीत दुखत असल्याने दिल्ली येथील आर अँड आर आर्मी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तेथे दाखल झाल्यानंतर सर्वात आधी त्यांचे रुटीन चेकअप करण्यात आले. हॉस्पिटलच्या हेल्थ बुलेटीनच्या माहितीनुसार, रामनाथ कोविंद यांची प्रकृती सध्या स्थिर असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

3 मार्च रोजी घेतली होती लस
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या मुलीला सोबत घेत दिल्ली येथील आर्मी हॉस्पीटलमध्ये कोरोना लसीचा पहिला डोस 3 मार्च रोजी घेतला होता. यानंतर राष्ट्रपतीनी देशात यशस्वीरित्या लसीकरणाचा अभियान चालवणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले होते आणि इतर लोकांना लस घेण्याचे आवाहन केले होते.

बातम्या आणखी आहेत...