आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमचा दावा:T10-T20ची सुरुवात मीच केली, आज संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला

हिसार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हरियाणा स्थित डेरा सच्चा सौदाचा म्होरक्या राम रहीमने T10 व T20 क्रिकेटची सुरुवात आपणच केल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला -24 वर्षांपूर्वी सिरसाच्या जलालआना गावात आम्ही टी-10 व टी-20 क्रिकेटची सुरुवात केली. तेव्हा मोठ-मोठे क्रिकेटपटू हे क्रिकेट आहे काय? कुणी खेळण्यास येत नाही असा दावा करत होते. पण आता संपूर्ण जगाने हा खेळ स्वीकारला आहे.

एक अट्ठा ही होता. त्यात चेंडू स्टेडियमबाहेर गेल्यानंतर 8 धावा मिळत होता. भविष्यात हा अट्ठा षटकारावर वरचढ ठरेल. राम रहीम सध्या 40 दिवसांच्या पॅरोलवर उत्तर प्रदेशच्या बागपत स्थित बरनावा आश्रमात थांबला आहे. त्याला 25 नोव्हेंबर पूर्वी रोहतकच्या सुनारिया तुरुंगात सरेंडर करायचे आहे.

राम रहीम हरियाणाच्या रोहतकच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याला यंदा तिसऱ्यांदा पॅरोल मिळाला आहे.

जलालआनातून झाली होती टी-10 ची सुरुवात

राम रहीमने डेऱ्याचे दुसरे गुरू शाह सतनामच्या सिरसा स्थित जलालआना या मूळगावातील डेराप्रेमींशी ऑनलाइन संवाद साधला. त्यात तो म्हणाला - सर्वप्रथम या पवित्र भूमीला वंदन. हे माझे गुरू शाह सतनाम सिंग यांचे जन्मस्थळ आहे. आपण येथे मिळून क्रिकेट स्टेडियम तयार केले होतो. येथेच टी-10ची सुरुवात झाली. कदाचित 1998 ची गोष्ट असेल. त्यानंतर टी-20 चीही सुरुवात झाली.

शाह सतनाम सिंगांच्या कुटुंबाचे स्मरण

राम रहीमने आपले जुने सहकारी राम, मक्खन, लीलाचे नाव घेतले. तसेच गुरू सतनाम सिंग यांच्या कुटुंबातील सदस्यांशीही चर्चा केली. त्यांची सून नछत्तर कौरशी संवाद साधला. त्यानंतर इतर सदस्यांची विचारपूसही केली. राम रहीम म्हणाला - मी विसरत नाही. नछत्तर कौरने राम रहीमची विचारपूस केली. त्यानंतर त्याने सर्वांना आशीर्वाद दिला. नछत्तर कौरने घरात दर्शन देण्याची मागणी केली. त्यानंतर कुटुंबातील सदस्य राज सिंह यांनी गावात येण्याची विनंती केली.

राम रहीमला दुसऱ्या गुरूने गादी दिली होती

डेरा सच्चा सौदा सिरसाचे पहिले गुरू शाह मस्ताना होते. त्यांनी डेऱ्याची स्थापना केली. त्यांच्या निधनानंतर शाह सतनाम यांना या डेऱ्याची गादी मिळाली. शाह सतनामकडून गुरमीत सिंग यांना गादीवर बसवले. त्यानंतर तेच गुरमीत सिंग राम रहीम म्हणून प्रसिद्ध झाले.

आता उत्तराधिकारी म्हणून हनीप्रीतची चर्चा

दुसरीकडे, डेऱ्याची गादी आता राम रहीमची कथित मुलगी हनीप्रीतला सोपवण्याची चर्चा सुरू आहे. राम रहीमने मागीलवेळी हनीप्रीतचा फॅमीली आयडीत समावेश करत तिची मुख्य शिष्या म्हणून नियुक्ती केली होती. यावेळी हनीप्रीतला रुह दी (रुहानी दीदा) असे नवे नाव देण्यात आले होते. डेऱ्याची गादी आतापर्यंत मुख्य शिष्यालाच मिळाली आहे. पण राम रहीमने ते फेटाळले. राम रहीमने यासंबंधीच्या सर्वच चर्चा चुकीच्या असल्याचे तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...