आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम रहीमला आवडला नाही 'जेल'चा प्रश्न:डेरा प्रेमीने पालेभाज्या उगवण्याविषयी विचारले असता दिले अनिच्छेने उत्तर

हिसार9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीमच्या पॅरोलचा कालावधी आता केवळ आठवडाभर उरला आहे. यामुळे तो आपला बहुतांश कालावधी आपल्या भक्तांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात घालवत आहे. पण एका डेरा प्रेमीने त्याला त्याच्या तुरुंगातील वास्तव्याविषयी प्रश्न विचारला असतो तो चांगलाच अस्वस्थ झाला. ऑनलाइ सत्संगमध्ये एका व्यक्तीने त्याला सुनारिया तुरुंगात पालेभाज्या उगवण्याविषयी प्रश्न केला होता.

डेरा प्रेमीने विचारले की, सुनारिया तुरुंगात तुम्ही शेती करता. तुम्ही उगवलेली एखादी पालेभाजी सर्वांना खाण्याची संधी मिळाली असे कधी झाले काय? झाले तर त्याचा अनुभव सांगा. त्यावर राम रहीमच्या चेहऱ्याचा रंग उडाला. पण त्यानंतरही त्याने अनिच्छेने प्रत्युत्तर दिले.

राम रहीमने सांगितले की, आम्ही तिथे शेती करतो. पालेभाज्याही उगवतो. सर्वकाही करतो. तिथेच कैद्यांसाठी भोजनही तयार करते. शेतीची आवड असल्याने मी तिथेही हेच काम करतो.

तुरुंगासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राम रहीम.
तुरुंगासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना राम रहीम.

आमची मुले कठीण स्थितीत खचत नाहीत

एका डेरा प्रेमीने राम रहीमला विचारले की, संकटात सर्वचजण डगमगतात. तुमच्या भक्तांवरही कठीण स्थिती ओढावली. पण त्यांची जिद्द व विश्वास अबाधित राहीला. डेऱ्याच्या विरोधकांनाही ही गोष्ट मान्य आहे. याचे गुपित काय आहे? त्यावर राम रहीमने सांगितले की, आमचे जिवन खुले पुस्तक आहे. आम्ही मुलांपुढे कोणतेही गुपित ठेवत नाही. ही मुले समाजाची सेवा करतात. कोणत्याही कठीण स्थितीत ते खचले नाही याचा आम्हाला आनंद आहे.

नाव घेतल्याने मृत बाळ झाले जिवंत

कर्नाळच्या असंधच्या सेवादारांनी यावेळी विचित्र दावा केला. सेवादारांच्या डेरा प्रमुखाने सांगितले की, एक जादू झाली. जवळच्या एका मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्या मुलाच्या पालकांनी नावाचा जप करत तुमच्या नावाची अरदास केली. त्यानंतर हे मूल जिवंत झाले. त्यावर राम रहीमने सांगितले की, सर्वकाही ईश्वराची कमाल आहे. तोच सर्वकाही करतो. या कार्यक्रमाला नगर परिषद असंधचे अध्यक्षही हजर होते.

बातम्या आणखी आहेत...