आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाध्वींचे लैंगिक शोषण व हत्येच्या 2 प्रकरणांत जन्मठेप भोगणाऱ्या राम रहीमने आता नशामुक्तीच्या नावाखाली आपल्या विरोधकांना खुले आव्हान दिले आहे. राम रहीम सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. यूपीच्या बागपत येथील बरनावा डेरा येथे ऑनलाइन सत्संग करताना राम रहीम म्हणाला की, तुम्ही फक्त तुमच्या धर्माच्या लोकांची नशेखोरी बंद करा. खुल्या मैदानात या, हेच आमचे आव्हान आहे.
राम रहीमने यावेळी आपल्या विरोधकांचे नाव घेतले नाही. पण त्याचा संदर्भ पंजाबमधील शीख संघटना व शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापनाकडे असल्याचे मानले जात आहे. यामुळेच SGPC आणि शीख संघटना राम रहीमच्या पॅरोलला विरोध करत आहेत.
आमच्या 6 कोटी प्रेमींची नशेखोरी बंद केली. मद्यपान करणारे, चरसा, चित्ता, अफू खाणारे आज रामाचे नाव घेत सेवा करत आहेत. ते अव्वल कोटीचे भक्त बनलेत, असे राम रहीम म्हणाले.
तुमच्या धर्माच्या लोकांची नशेखोरी थांबवा
डेरा प्रमुख म्हणाले की, आम्ही वारंवार देशातील मान्यवरांना आवाहन करत आहोत. सर्व धर्मातील मान्यवरांनी यावे आणि रामाचे नाव घेऊन नशा सोडावी. उर्वरित गोष्टी करता राहा, पण किमान एकदा तरी समाज सुधारण्याचे कार्य करा.
हे माझे आहे, हे तुझे आहे, सर्व एकाच प्रकाशातून जन्मलेले आहेत. तुमचा धर्म बरोबर आहे असे तुम्हाला वाटते. आम्ही म्हणतो की सर्व बरोबर आहेत. तुमच्या धर्माच्या लोकांची नशेखोरी बंद करा. यातून बरेच काही होईल.
व्यसनमुक्तीसाठी मैदानात या
डेरा प्रमुख म्हणाले की, आम्ही राम रहीमच्या सांगण्यावरून सुरुवात केली तर नंबर त्यांचाच येईल असे तुम्हाला वाटत असेल. पण तुम्ही करा, तुमचा नंबर येईल. माझेही नंबर घ्या. पण व्यसनमुक्तीसाठी मैदानात या.
SGPC करत आहे विरोध
राम रहीमच्या पॅरोलला SGPCचा विरोध आहे. पंजाबमध्ये 29 जानेवारी रोजी राम रहीमने शाह सतनाम सिंग यांचा भंडारा भटिंडाच्या सलाबतपुरा येथे ठेवला होता. अनेक शिख तरुणांनी त्याचा विरोद केला. दुसरीकडे, SGPCनेही राम रहमीच्या पॅरोलविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राम रहीम आता त्यांना आव्हान देत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.