आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारणातील 'हवामानशास्त्रज्ञ' होते पासवान:लालू-नीतीश यांच्यापूर्वीच राजकारणात झाली एंट्री; 1969 मध्ये सुरू झाला राजकीय प्रवास

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो 35 वर्षे जुना आहे. यात लालू प्रसाद यादव,शरद यादव आणि रामविलास पासवान आहेत. - Divya Marathi
हा फोटो 35 वर्षे जुना आहे. यात लालू प्रसाद यादव,शरद यादव आणि रामविलास पासवान आहेत.

भारताच्या राजकारणात 'हवामान शास्त्रज्ञ' नावाने ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा राजकीय प्रवास पाच दशकांपेक्षाही पुर्वीचा आहे. मागील दोन दशकांपासून ते केंद्रातील प्रत्येक सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. पाच दशकांच्या राजकीय प्रवासात रामविलास पासवान 8 वेळा लोकसभेवर निवडूण गेले. लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार जेव्हा आपल्या विद्यार्थी दशेत होते, तेव्हा रामविलास पासवान विहार विधानसभेत निवडूण गेले होते.

इमरजेंसीदरम्यान इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारच्या विरोधात जाण्यापासून पुढे पाच दशकांपर्यंत पासवान अनेकवेळा कधी काँग्रेससोबत, तर कधी काँग्रेसविरोधात लढत राहिले आणि प्रत्येकवेळी विजयी झाले. 1977 च्या लोकसभा निवडणुकीत हाजीपूरमधून जनता दलाच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या पासवान यांनी त्यावेळेस चार लाखांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. यानंतर 2014 पर्यंत ते आठ वेळेस लोकसभेवर निवडूण गेले. सध्या ते राज्यसभेचे सदस्य होते.

1969 मध्ये सुरू झाला राजकीय प्रवास

रामविलास पासवान यांचा राजकीय प्रवास 1969 मध्ये तेव्हा सुरू झाला, जेव्हा ते संयुक्त सोशलिस्ट पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवून बिहार विधानसभेत गेले होते. खगडियातील एका दलित कुटुंबात 5 जुलै 1946 मध्ये जन्म झालेले रामविलास पासवान राजकारणात येण्यापूर्वी बिहार प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. पासवान यांनी इमरजेंसीदरम्यान तुरुंगवास भोगला. इमरजेंसी संपल्यानंतर पासवान तुरुंगातून बाहेर आले आणि जनता दलमध्ये सामील झाले. जनता दलाच्या तिकीटावर त्यांनी हाजीपूर लोकसभा निवडणुकीत 1977 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

वीपी सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये संधी

1977 च्या रेकॉर्डब्रेक विजयानंतर रामविलास पासवान परत 1980 आणि 1989 लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. यानंतर विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले. पुढील अनेक वर्षे विविध सरकारमध्ये पासपाव रेल्वेपासून दूरसंचार आणि कोळसा मंत्रालययापर्यंत जबाबदारी सांभाळली. यादरम्यान ते भाजप, काँग्रेस, राजद आणि जदयूसोबत अनेक युत्या/आघाडीमध्ये सामील झाले आणि केंद्र सरकारमध्ये मंत्री राहिले. पासवान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील दोन्ही सरकारमध्ये अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री राहिले आहेत.

एनडीएची साथ सोडून काँग्रेसमध्ये सामील

रामविलास पासवान यांनी 2002 च्या गोधरा कांडानंतर तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि एनडीएची साथ सोडली. त्यानंतर पासवान काँग्रेसच्या मनमोहन सिंद कॅबिनेटमध्ये दोन वेळा मंत्री राहिले. परंतू, 2014 मध्ये त्यांनी परत यूपीएची साथ सोडून एनडीएमध्ये सामील झाले. 2014 आणि 2019 मध्ये त्यांना मोदी सरकारमध्ये महत्वाचे खाते देण्यात आले.

पासवान यांचे खासगी आयुष्य नेहमी पडद्यामागे राहिले

देशाच्या राजकारणात अनेक दशके राहिलेल्या पासवान यांचे खासगी आयुष्य नेहमी पडद्यामागे राहिले. पासवान यांनी दोन लग्न केले होते. त्यांच्या पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली तर दुसऱ्या पत्नीपासून मुलगा चिराग आणि एक मुलगी आहे. त्यांची पहिली पत्नी अजूनही शहरबन्नी गावात राहतात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser