आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आपली निष्क्रियता व कृतीमुळे विश्वासार्हता गमावल्याचे खडेबोल सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी शुक्रवारी सुनावले. 'सीबीआयला पुन्हा एकदा जनतेचा विश्वास प्राप्त करावयाचा असेल तर तिला राजकारण्यांसोबतची आपली मैत्री तोडावी लागेल,' असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील पोलिस यंत्रणेवरही भाष्य केले.
'काळानुरुप राजकीय कार्यकारी बदलतील. पण, तुम्ही बदलणार नाही. तुम्ही स्थायी आहात. पोलिसांच्या कामाची पद्धत आजही ब्रिटीशकालीन आहे. ती बदलण्याची नितांत गरज आहे', असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा शुक्रवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात 'लोकशाहीतील तपास यंत्रणेची भूमिका व जबाबदारी' या विषयावर व्याख्यान देताना म्हणाले.
राजकारण्यांसोबतची आघाडी साखळी तोडावी लागेल
'तुम्हाला पुन्हा विश्वासार्हता प्राप्त करावयाची असेल तर तुम्हाला सर्वप्रथम राजकीय नेत्यांसोबत असणारी आपली आघाडी संपुष्टात आणावी लागेल. हरवलेली प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी हे काम तुम्हाला सर्वप्रथम करावे लागेल', असेही रमणा यावेळी सीबीआयला उद्देशून म्हणाले.
स्वायत्त तपास यंत्रणेची गरज
सीबीआयसह सर्वच तपास यंत्रणांना एका छताखाली आणण्याची गरज आहे. यासाठी एक स्वायत्त तपास यंत्रणा हवी आहे. या यंत्रणेची जबाबदारी एका स्वतंत्र व्यक्तीकडे सुपूर्द केली पाहिजे, असे सरन्यायाधीश म्हणाले.
आधूनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा तुटवडा
सरन्यायाधीश म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांवरील कामाचा भार वाढला आहे. पण, त्यांच्याकडे संसाधनांचा तुटवडा आहे. सीबीआयकडे आधूनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ अधिकाऱ्यांसह अनेक पायाभूत सुविधा नाहीत. यामुळे प्रकरण सोडवताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.