आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramayana Video Resto Bar Controversy; DJ Arrested | Gardens Galleria Mall | Noida

व्हायरल VIDEO:बारमध्ये रामायणाच्या रिमिक्सवर डान्स; एफआयआर दाखल, नोएडा मॉल बारचा मालक-व्यवस्थापकाला अटक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गार्डन गॅलेरिया मॉलच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अरुण गोविल श्रीरामच्या भूमिकेत दिसत आहेत.  - Divya Marathi
गार्डन गॅलेरिया मॉलच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये अरुण गोविल श्रीरामच्या भूमिकेत दिसत आहेत. 

नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलमधील लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स रेस्टो-बारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ड्रिंक्स पार्टीमध्ये रामानंद सागर यांच्या टीव्ही शो रामायणची रीमिक्स क्लिप वाद्य-संगीतासह वाजवली जात होती.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नोएडा पोलिसांनी स्वत: या प्रकरणी एफआयआर नोंदवला. यानंतर पोलिसांनी गार्डन गॅलेरियातील लॉर्ड ऑफ ड्रिंक्स बारच्या सहमालक आणि व्यवस्थापकाला अटक केली.

श्रीराम-रावण युद्ध दृश्य रिमिक्स

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही लोक नाचताना आणि गाताना दिसत आहेत. त्यांच्या मागे रामायण शोमधील श्री राम-रावण युद्धाचे दृश्य मोठ्या पडद्यावर दिसते. पुढे दोघांचे संवाद पुढे-मागे वाजवले गेले, सोबतच फास्ट म्यूझिकही वाजत आहे.

डीसीपी नोएडा शक्ती अवस्थी यांनी सांगितले की, या प्रकरणावर कारवाई करत सेक्टर 39 पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. यानंतर सहमालक माणक अग्रवाल आणि व्यवस्थापक अभिषेक सोनी यांना अटक करण्यात आली, तर संबंधित डीजे सध्या चेन्नईत आहे.

तिघांवरही IPC कलम 153A (सद्भावना किंवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचे कृत्य) आणि 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने प्रार्थनास्थळाची विटंबना करणे किंवा नुकसान करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर युजर्सनी नोएडा पोलिसांना टॅग केले

ट्विटरवर व्हिडिओ क्लिप शेअर करताना, एका यूजरने यूपी पोलिस तसेच नोएडा पोलिसांना टॅग केले. तसेच नोएडामध्ये हा व्हिडिओ खुलेआम चालवला जात असून हिंदू धर्माची खिल्ली उडवली जात असल्याचेही लिहिले आहे. यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा तोडफोड झाल्यास त्यास ते (रेस्टो-बार) जबाबदार असतील, असे म्हटले होते.