आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांची तब्येत बिघडली:रमेश पोखरियाल निशंक एम्समध्ये दाखल; CBSC 12 वीच्या परीक्षेवर आज घेणार होते निर्णय

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेरोना संसर्ग झाल्यानंतर येत होत्या अडचणी

केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची अचानकपणे तब्येत बिघडल्यामुळे त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज 1 जून रोजी ते सीबीएसी बोर्डासोबत बैठक करणार होते. यामध्ये सीबीएसीच्या 12 वीच्या परीक्षेवर निर्णय घेण्याची दाट शक्यता जात वर्तवली होती. पोस्ट कोविडच्या समस्येमुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करावे लागले.

एम्स अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिक्षणमंत्री पोखरियाल हे 21 एप्रिल रोजी कोरोनाबाधीत झाले होते. त्यानंतर 5 ते 6 मे रोजी त्यांचा कोरोना अवहाल निगेटिव्ह आला होता. तेंव्हापासून त्यांना अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आज होणार होता निर्णय
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयल निशंक यांचे 1 जूनला सीबीएसईसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. परंतु, अचानकपणे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, 12 वीची परीक्षा घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, परीक्षेसंदर्भांतील तारखा आणि स्वरूप अद्याप निश्चित केलेले नाही. तर काही राज्यांत 12 वीची परीक्षा घेण्याचा निर्णयही त्यांच्या बोर्डावर सोडण्यात आला आहे. यापूर्वीच्या बैठकीत सीबीएसईने बोर्डाच्या परीक्षेसाठी 2 पर्याय ठेवले होते.

बातम्या आणखी आहेत...