आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ramnath Kovind Updates: Death Of Entrepreneurial Woman By Special Train Of President Of India; News And Live Updates

राष्ट्रपतींच्या रेल्वेने वाहतूक कोंडी:उद्योजक महिलेचा मृत्यू; राष्ट्रपतींना कळताच कलेक्टरना पीडित कुटुंबीयांच्या घरी पाठवले

कानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रपती रामनाथ कोविंद काही वर्षांनंतर गावी गेले. परंतु या दौऱ्याच्या आठवणीत एक दु:खद घटना जोडली गेली. शुक्रवारी राष्ट्रपती प्रवास करत असलेली रेल्वे गोविंदपुरी पुलावरून जात असताना ४५ मिनिटे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली. या वाहतुकीत अडकल्याने इंडियन इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कानपूर शाखेच्या अध्यक्षा ५० वर्षीय वंदना मिश्रा रुग्णालयात पोहोचू शकल्या नाहीत. त्यांचे निधन झाले.

शनिवारी सकाळी विश्रामगृहात थांबलेल्या राष्ट्रपतींच्या पत्नींना याबाबतची माहिती कळाली. त्यांनी ही घटना राष्ट्रपतींना सांगितली. यावर राष्ट्रपतींनी कानपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना तत्काळ पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी पाठवले. या प्रकरणी एका पोलिस अधिकाऱ्यासह चार वाहतूक निरीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. कोरोनातून पूर्ण बरी झाल्यानंतर वंदना यांना काही आरोग्याच्या समस्या होत्या.

काही दिवसांपासून त्यांच्यावर यासंबंधी उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. तेवढ्यात पोलिसांनी वाहतूक थांबवली. कुटुंबीयांना पोलिसांना याबाबत वारंवार विनंती केली, पंरतु पोलिसांनी परवानगी दिली नाही. रुग्णालयात पोहोचेपर्यंत वंदना यांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...