आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rampage In More Than 20 Kovid Hospitals In The City, Forced To Give Leave To Patients; News And Live Updates

भोपाळमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा:शहरातील 20 पेक्षा जास्त कोविड रुग्णालयात सावळा गोंधळ; ऑक्सिजन अभावी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिली जबरदस्तीने सुट्टी

भोपाळ9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विशेष म्हणजे एकाच दिवसापूर्वी मध्यप्रदेश सरकारने राज्यात आक्सिजनाचा पर्याप्‍त साठा असल्याचे सांगितले होते

कोरोना महामारीमुळे देशात सर्वच ठिकाणी आता ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध होत नसल्याने त्यांचा तडफडून मृत्यू होत आहे. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये आक्सिजनच्या अभावामुळे 20 पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये गोंधळ माजला आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पाच रुग्ण दगावले आहे. विशेष म्हणजे एकाच दिवसापूर्वी मध्यप्रदेश सरकारने राज्यात आक्सिजनाचा पर्याप्‍त साठा असल्याचे सांगितले होते. परंतु, दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी ऑक्सिजन अभावी पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात ऑक्सिजन अभावी एकाच दिवसांत चार रुग्णांचा मृत्यू झाला असून यामध्ये सौरभ गुप्ता (30 वर्ष) , तुषार(35 वर्ष), उर्मिला जैन (60 वर्ष)आण‍ि आशा पटेल यांचा समावेश आहे. ही घटना शहरातील एमपी नगरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये घडली आहे.

ऑक्सिजन अभावी हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून रुग्णांना दिली जबरदस्तीने सुट्टी
शहरात ऑक्सिजनचा पर्याप्त पुरवठा नसल्याने काही हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून रुग्णांना जबरदस्तीने सुट्टी दिली जात आहे. शहरातील पीजीएमबी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नसल्याने एका रुग्णांला डिस्चार्ज दिला होता. दरम्यान, त्या रुग्णाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. भोपाळ शहरात ऑक्सिजनचा पर्याप्त पुरवठा नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...