आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ranchi Violence Vs Jumma Ki Namaz; Mudassir Alam And Sahil Motheres On Son Death

नमाजसाठी गेला, तो परतलाच नाही:कसा झाला मुदस्सिर आणि साहिलचा मृत्यू? कुटुंबीयांची मागणी- 'न्याय राहिला लांब, आधी FIR तर नोंदवा'

लेखक: वैभव पळणीटकर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारखंडची राजधानी असलेल्या रांची शहरातील मुख्य बाजार क्षेत्रात शुक्रवारी (10 जून) दुपारी नमाजनंतर हिंसाचार उफाळला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. हिंसाचार उफाळला तेव्हा जवळच्या मुस्लिमबहुल भागात वास्तव्याला असलेला 15 वर्षीय मुदस्सिर आणि 21 वर्षीय साहिल हे दोघेही घटनास्थळी होते. गोळी लागल्याने या दोघांचा मृत्यू झाला. मात्र, साहिल आणि मुदस्सिरचा मृत्यू हा पोलिसांची गोळी लागून झाला की इतर कुणाच्या बंदुकीतून निघालेली गोळी त्यांना लागली, हे अद्याप स्पष्ट नाही. मुदस्सिर आणि साहिल हे दोघेही अत्यंत गरीब घरातून येतात. साहिल हा एका रिक्षा चालकाचा मुलगा आहे. तर मुदस्सिरच्या वडिलांचा फळांचा गाडा आहे.

दहावीचा निकाल न पाहताच मुदस्सिरचा मृत्यू

रांचीतला हिंदपीढी मोहल्ला. हाच तो भाग जिथे शुक्रवारी 10 जून रोजी हिंसाचार, दंगल आणि जाळपोळ झाली होती. अरुंद अशा गल्लीबोळातून आम्ही मुदस्सिरच्या घरी पोहोचलो. तसे, त्याला घर म्हणणे योग्य ठरणार नाही. कमकुवत टिनच्या दरवाजातून आत शिरलो तर समोर छोटीशी अर्धी पक्की खोली होती. अंगणात कोंबड्या होत्या. लाल रंगाच्या तंबूच्या खुर्च्यांवर काही पुरुष आणि काही मुले बसलेली होती. ही मुले मुदस्सिरचे मित्र होते.

एका मित्राने सांगितले की, ‘अबे हम मरबू ना बे, तो पूरा रांची जाने..’(म्हणजेच जेव्हा मी मरेन, मी संपूर्ण रांची शहराला माहिती होईल) असे मुदस्सिर नेहमी म्हणायचा. तो अभ्यासात हुशार होता. तसेच तो स्वतंत्रपणे कॉम्प्युटरचे क्लासही घेत असे. शिवाय, वडिलांना फळ-भाज्यांच्या गाडा चालवण्यातही मदत करायचा. आज एक मुदस्सिर मरण पावला आहे. पण आता या भागातील प्रत्येक मुलगा मुदस्सिर बनेल आणि गरज पडल्यास शहीदही होईल, असे तेथील मुले म्हणाले. आम्ही कॅमेरा बाहेर काढताच मुदस्सिरच्या प्रत्येक मित्राने तोंड लपवायला सुरुवात केली. आमचा फोटो काढू नका, 12 हजार लोकांवर एफआयआर दाखल झाला आहे. पोलिस रात्रीच्या वेळी येथे चक्करा मारत आहेत. त्यांनी आम्हाला पाहिले तर उचलून घेऊन जातील, असे ते म्हणाले.

मुदस्सिरच्या मित्रांनी सांगितले की, 12 हजार लोकांवर एफआयआर दाखल झाला आहे. पोलिस रात्रीच्या वेळी येथे चक्करा मारत आहेत.
मुदस्सिरच्या मित्रांनी सांगितले की, 12 हजार लोकांवर एफआयआर दाखल झाला आहे. पोलिस रात्रीच्या वेळी येथे चक्करा मारत आहेत.

मृतक मुदस्सिरची आई निखत परवीन यांचे अश्रू सुकले होते. त्यांचे डोळेही नीट उघडत नव्हते. मुदस्सिर हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. मी जेव्हा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जास्त वेळ त्यांच्याशी बोलू नका. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी अन्नपाणी घेतलेले नाही. त्या बेशूद्ध होत आहे, असे कुटुंबीयांनी सांगितले.

लाल सलवार घातलेल्या निखत एका बाजेवर पडून होत्या. काही महिला त्यांच्या बाजूला बसलेल्या होत्या. डोक्यावर कोणतेही पक्के छप्पर नव्हते, खोली प्लास्टिकच्या शीटने झाकलेली होती. जी सारखी वाऱ्याने उडत होती. आम्हाला पाहून निखत आत्मविश्वासाने उठल्या आणि शेजारी बसलेल्या बाईच्या खांद्यावर डोके ठेवले.

माझा मुलगा निशस्त्र होता, मग त्याला गोळी का घातली?

त्या म्हणाल्या की, माझ्या मुलाच्या मृत्यूला सरकार जबाबदार आहे. रस्त्यावर जे काही चालले होते, ते सर्वांसमोर आहे. सर्वांना माहिती आहे. ज्याच्यामुळे माझा मुलगा मरण पावला, त्याचाही मृत्यू झाला पाहिजे. मुलाने नुकतीच मॅट्रिकची परीक्षा दिली होती, त्याचा निकाल दोन दिवसांनी येणार होता. तो कॉम्प्युटर क्लास घेत होता. आमच्या संपूर्ण वस्तीतील लहान मुले आणि वयस्कर त्याच्यावर प्रेम करायचे. ज्याच्यावर ऐवढे जण प्रेम करत असतील तर तो मुलगा कसा असेल, हे तुम्ही समजू शकता.

माझ्या मुलाचा मृत्यू झाला, याचा मला राग नाही. तो शहीद झाला आहे. आमचे हुजूर पाक सल्ल्लाहुवसल्लम हे आमच्या हृदयात वास करतात. त्यांच्यासाठी आम्ही छातीत गोळी घ्यायला तयार आहोत. यालाच मृत्यू म्हणतात ना, हौतात्म्य म्हणतात. शहीद झालेला मुलगा चांगला असतो. माझा मुलगा गुन्हेगार नव्हता. त्याचे कधीच कोणाशी भांडण झाले नाही. मग त्या 15 वर्षाच्या मुलाला गोळ्या का घातल्या? माझ्या मुलाने विटा, दगड, तलवारी, काठ्या चालवल्या असत्या, तर तो चुकीचा होता आणि त्याला गोळी घातली गेली, असे मी मानले असते, पण तो निशस्त्र होता.

10 जूनला अपघात झाला, पण अद्याप एफआयआरची प्रत मिळालेली नाही

मुदस्सिरचे वडील आणि काका पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी चक्करा मारत आहेत. मार्केट पोलिस स्टेशनच्या बाहेर दोघेही 12 जूनच्या सकाळपासून मुलाच्या मृत्यूची एफआयआर लिहून घेण्याची विनंती करत होते. मात्र, 1-2 तासांनी या असे सांगून पोलिसांकडून टाळाटाळ करण्यात आली.

मृतक मुदस्सिरचे काक मोहम्मद शाहिद यांनी सांगितले की, '15 वर्षांचा मुदस्सिर वडिलांच्या फळ-भाज्यांच्या गाड्या चालवण्यात मदत करायचा. हिंसाचार झाला, त्या दिवशी तो आपल्या वडिलांसोबत डेली मार्केटच्या रस्त्यावर फळाच्या गाडीसह होता. मोठा जमाव आल्यावर मुदस्सिर त्या गर्दीत सामील झाला. काही वेळातच मंदिर आणि पोलिसांकडून गोळीबार सुरू झाला. यातच मुदस्सिरला गोळी लागली आणि तो कोसळला. आमच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. ज्याने गोळ्या झाडली त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

चार भावंडांचा आधार होता साहिल

21 वर्षीय साहिलचे घर हे संकट मोचन मंदिरापासून 900 मीटर अंतरावर आहे. मुदस्सिरप्रमाणे साहिलही गरीब घरचा. त्याचे वडील ऑटो चालवतात. त्याचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले. तो न्यू मार्केटमध्ये एका मोबाइलच्या दुकानात कामाला होता. याप्रमाणे महिनाअखेरीस त्याला 10-12 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. साहिलचे आई आणि वडिल आजारी असून त्याला चार भांवडे आहेत. 4 भावंडांपैकी साहिल हा घरातील मुख्य कमावणारा होता.

एक दिवस आधीच त्याच्या आईच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कानावर आली. मुदस्सिरच्या आईप्रमाणेच साहिलची आईही आपल्या मुलगा शहीद झाला, असे मानते. ज्या दिवशी आम्ही साहिलच्या घरी पोहोचलो त्याच दिवशी त्याचा अंत्यसंस्कार होणार होता. घरात आणि आजूबाजूला सगळीकडे लोक संतप्त होते. परिस्थिती नाजूक असल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी जाण्याचे ठरवले.

'शुक्रवारी नमाजनंतर घरी आला, जेवण केले. तेव्हा वाटलेही नव्हते की हे त्याचे शेवटचे जेवण असेल'

मुलाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर साहिलची आई सोनी परवीन यांची रडून-रडून अतिशय वाईट अवस्था झाली होती. त्यांचे डोळे सुखले होते आणि गळाही कोरडा पडला होता. त्यांनी सांगितले की, 'साहिल हा पाचवेळचा नमाज करायचा. त्याचे कधीही कोणाशी भांडण झाले नाही. दररोज सकाळी उठून तो मोबाईलच्या दुकानात कामाला जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. तोच घर चालवत असे. शुक्रवारी आंघोळ करुन तो नमाज अदा करण्यासाठी गेला. त्यानंतर घरी आला आणि 2:30 वाजता जेवण केले. यानंतर आपली टोपी घालून कामावर निघून गेला. त्याला गोळी लागल्याची बातमी आम्हाला चारच्या सुमारास मिळाली. माझे आणि त्याचे शेवटचे बोलणे हे जेवताना झाले होते. आता गेला तर त्याचा मृतदेहच घरी येईल, असे वाटलेही नव्हते. तो दंगा करायला नाही तर कामावर गेला. दिवसभराच्या कामात गरिबांना आंदोलन करायला वेळ मिळत नाही. साहिलला पोलिसांनी गोळी घातली.

बातम्या आणखी आहेत...