आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Randeep Hooda Stucks In Trouble After Passing A Very Dirty And Sexist Joke About Mayawati

अभिनेता रणदीप हुड्डा अडचणीत:बसपाच्या नेत्या मायावती यांच्यावर केला वादग्रस्त आणि सेक्सिस्ट जोक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या घटनेनंतर यूनाइटेड नेशनने अँबेसडर पदावरुन काढले

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सलमान खान स्टारर 'राधे : योर मोस्ट वांटेड भाई' चित्रपटात मुख्य विलेनचे पात्र करणारा रणदीप हुड्डा अडचणीत सापडला आहे. हुड्डाने बहुजन समाज पार्टी (BSP) च्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यावर खालच्या स्तरावरील सेक्सिस्ट जोक केला आहे. या घटनेनंतर हुड्डावर टीकेची झोड उठली आहे.

एकीकडून सोशल मीडियावर हुड्डावर टीका होत असताना, दुसरीकडे त्याच्या अटकेची मागणीदेखील होत आहे. हिसारमधील एक वकील मलकीत सिंहने हिसारच्या एसपींना या प्रकरणाची तक्रार केली आहे. तक्रारकर्त्यांनी रणदीपविरोधात SC/ST गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

UN ने अँबेसडर पदावरुन हटवले

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हुड्डाला यूनाइटेड नेशनने जंगली जनावरांच्या संरक्षण संमेलनाच्या (CMS) अँबेसडर पदावरुन हटवले आहे. CMS सचिवालयने म्हटले की, हुड्डाने केलेली वक्तव्ये निंदनीय आहेत. पुढे त्यांनी सांगितले की, फेब्रुवारी 2020 मध्ये हुड्डाला अँबेसडर नियुक्त केले, तेव्हा या व्हिडिओबद्दल माहिती नव्हती.

काय आहे प्रकरण ?

रणदीप हुड्डाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो स्टेजवरुन प्रेक्षकांना संबोधित करत आहे. यात रणदीप ऑडियंसकडे पाहतो आणि म्हणते- मी तुम्हाला एक घाण जोक सांगणार आहे. यानंतर तो म्हणतो- मिस मायावती रस्त्याने दोन मुलांसोबत जात होत्या. समोरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने विचारले- ही जुळी मुले आहेत का ? त्या म्हणाल्या- नाही, एक चार वर्षांचा आहे आणि दुसरा आठ वर्षांचा. तो व्यक्ती म्हणतो- मी विश्वास नाही करू शकत, इथे दुसऱ्यांदा कुणी व्यक्ती जाऊ शकतो...?

असे वाढले प्रकरण ?
रणदीप हुड्डाच्या जोकला अनेक सोशल मीडिया यूजर्सने शेअर करत टीका केली. CPIML नेते कविता कृष्णनने नाराजी व्यक्त करत आपल्या पोस्टमध्ये लिहीले, "असे जातीवाचक आणि सेक्शुअल व्हायलेंस योग्य नाही. दलित, आदिवासी महिलेला चुकीच्या आणि घृणास्पद पद्धतीने दाखवण्यात आले. यानंतर सोशल मीडियावर #arrestRandeepHooda ट्रेंड करत आहे.

बातम्या आणखी आहेत...