आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिवंगत अभिनेता सुशातसिंग राजपूतचा शाप रणवीरसिंगला लागला आहे, असा गौफ्यस्फोट चित्रपट समीक्षक केआरकेने केला. केआरके म्हणाला की, रणवीरसिंगचे चित्रपट बॅक टू बॅक डिझास्टर्स ठरत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे रणवीरने एकेकाळी सुशांतला मिळणारे चित्रपट स्वतःकडे खेचून आणून त्याचे करिअर घडवले.
KRK च्या म्हणण्यानुसार, 'गोलियों की रासलीला और रामलीला' या चित्रपटात सुशांतसिंग राजपूतची कास्टींग झाली होती. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचा तो पहिला पसंत होता. पण यशराज फिल्म्ससोबतच्या करारामुळे तो चित्रपट करू शकला नाही. केआरके म्हणतो की, जर सुशांतला रामलीला चित्रपट मिळाला असता तर जे स्टारडम रणवीरला मिळाले आहे ते इतक्या लवकर मिळाले नसते.
रणवीरसिंग कर्माचे फळ भोगतोय
कमाल रशीद खान उर्फ केआरके अनेक प्रसंगी सिनेतारकांना लक्ष्य करत असतो. शाहरुख, सलमान आणि अक्षय कुमारनंतर आता तो रणवीर सिंगच्या मागे लागला आहे. नुकत्याच आलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर रणवीरसिंगचे जवळपास सर्वच चित्रपट फ्लॉप झाले आहेत. आज रणवीरसोबत जे काही घडत आहे ते सर्व कर्माचे फळ आहे.
'रामलीला'ने रणवीर बनला स्टार
रणवीर सिंगला गोलियों की रासलीला आणि रामलीला या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांना बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सारखे चित्रपट मिळाले. या दोन चित्रपटांनंतरच रणवीर यशाच्या शिखरावर पोहोचला. या चित्रपटांनंतर रणवीर आणि दीपिकाची जोडीही हिट ठरली.
'गोलियों की रासलीला रामलीला' हा चित्रपट बनणार होता, तेव्हा या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना सुशांत सिंग राजपूतला कास्ट करायचे होते, पण आदित्य चोप्राने यशराज फिल्म्ससोबत केलेल्या करारामुळे ते करू शकले नाहीत, अशा बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. नंतर संजय लीला भन्साळी यांनी रणवीर सिंगला जबरदस्तीने कास्ट केले.
सुशांतने 14 जून 2020 ला जगाचा निरोप घेतला
सुशांतसिंग राजपूत 14 जून 2020 रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी मृतावस्थेत सापडला होता. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसून आले, मात्र नंतर माध्यम आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. गेल्या सीबीआयच्या अहवालात मृत्यूचे खरे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले होते. सुशांत नैराश्याशी झुंज देत असल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.