आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rape Case Against Congress MLA Umang Singhar I Allegation Of Sexual Abuse And Mental Torture By Luring Marriage I Latest News And Update 

काँग्रेस आमदार उमंग सिंघारवर बलात्काराचा गुन्हा:लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण व मानसिक छळ केल्याचा आरोप

नवी दिल्ली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेशच्या कमलनाथ सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले उमंग सिंघार यांच्यावर धार पोलिसांनी घरगुती हिंसाचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सिंघार हे गंधवानी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सचिवपदाची त्यांच्यावर जबाबदारी असून ते अनेक राज्यांतील कॉंग्रेसचे प्रभारीही आहेत.

एका 38 वर्षीय पीडितेने आधी जबलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जिथून धार पोलिसांकडे ही तक्रार वर्ग करण्यात आली. यानंतर धार पोलिस ठाण्यात सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लग्नाचे अमिष देऊन आमदार सिंघार यांनी वारंवार महिलेवर लैंगिंक अत्याचार करून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. '

धार जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आदित्य प्रतापसिंह यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्यांसह कलम 376, 377, 898A अंतर्गत आमदार सिंघार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीवर देखील मारहाणीचा गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेस आमदार उमंग सिंघार यांच्या पत्नीवर देखील मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. घरकाम करणाऱ्या महिलेनेच त्यांच्याविरोधात आरोप केला होता. आमदाराच्या पत्नीने शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...