आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रेयसीने धर्म-परिवर्तन करण्यास नकार दिल्यानंतर प्रियकरांना तिला स्टेशनवर सोडत पळ काढला. या घटनेच्या चार दिवसांपूर्वी आरोपीने तरुणीला वेगवेगळ्या जागेवर बोलवून तिच्यावर बलात्कार केले. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीने तरुणीला मध्य प्रदेशातील खंडवा येथून पळून अमरावतीला आणले होते. त्यानंतर आरोपीच्या कुटुंबियांनी सदरील पीडित तरुणीला धर्म-परिवर्तन केल्यानंतरच लग्न लावून दिले जाईल. अशी अट ठेवली. मात्र तरुणीने धर्म-परिवर्तन करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिला खंडवा रेल्वे स्टेशन सोडून देत पळ काढले.
त्यानंतर तरुणीने खालवा पोलिस स्टेशन गाठत बलात्कार आणि धर्म परिवर्तन याखाली तक्रार दाखल केली आहे. सदरील घटना रोशनी पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. मात्र तेथील पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस नसल्याने तरुणीने आपला जबाब नोंदवता आले नाही. त्यामुळे तरुणीने खालवा पोलिस स्टेशनमध्ये आपली आपबिती सांगितली. तरुणीचे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून, गेल्या वर्षी तिची महाराष्ट्रातील अमरवती अंजनगाव येथील दानिश खान या तरुणासोबत मैत्री झाली होती. त्यानंतर दानिशने तिचा मोबाइल नंबर घेतल्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरू झाले होते. काही दिवसांपूर्वीच दानिशने त्या तरुणीला असे सांगितले की, मी तुझ्यासोबत लग्न करू इच्छितो आणि तुला घेण्यासाठी मी खंडवा येथे येत आहे.
तरुणीवर केला बलात्कार
तरुणीने पोलिसांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, एका कारच्या साहाय्याने तरुणी रोशनी बस स्थानकावर पोहचली होती. त्याठिकाणी दानिश देखील आला होता. घरात कुणालाही न सांगता ही तरुणी दानिशला भेटण्यासाठी रोशनी स्थानकावर पोहोचली, त्यानंतर ती दानिशच्या कारमध्ये बसली. सुमारे रात्री आठ वाजेदरम्यान दानिशने तिला पळवून त्याच्या गावी आणले. ओळखीच्या एका जागेवर सोडून तो त्या ठिकाणाहून निघून गेला आणि परत एका तासानंतर आला. त्यानंतर त्यानं घराच्या पाठीमागे नेत सदरील तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर दानिशने तिला एका कापसाच्या जिनिंगमध्ये नेत तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले. असे तरुणीने पोलिसांना सांगितले आहे.
धर्म-परिवर्तन करण्याची अट
तरुणीने पोलिसांना सांगितले की, मी दानिशला लग्नाचे सांगितले असता, त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितले. मात्र त्यांनी या लग्नास स्पष्टपणे नकार दिला कारण, मी हिंदू आहे. त्यामुळे तू धर्म-परिवर्तन कर त्यानंतरच तुझे दानिशसोबत लग्न लावण्यात येईल असे सांगण्यात आले. दानिशने देखील मला धर्म परिवर्तन करुन मुस्लिम धर्म स्विकारायला सांगितले. मात्र मी त्याला स्पष्टपणे नकार दिला. मी दानिशला माझ्या गावी सोडून येण्यास सांगितले. त्यानंतर त्याने मला कारमध्ये खंडवा येथे सोडले. त्यांतर तरुणीने पोलिसांनी आपली आपबिती सांगितली. पोलिसांनी दानिश विरोधात कलम 343,366,376 (02) आणि धर्म स्वातंत्र अधिनियम कलम 3 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस आरोपी दानिशला अटक करण्यासाठी आता महाराष्ट्रात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.