आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rapid Card Kit Created By A Scientist In Madhya Pradesh, States Infection Status In 10 Minutes

ग्वाल्हेर:मध्य प्रदेशच्या शास्त्रज्ञाने तयार केले रॅपिड कार्ड किट, 10 मिनिटांत सांगते संसर्गाची स्थिती 

ग्वाल्हेर3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • हे किट बाजारात 300 - 400 रुपयात उपलब्ध होईल

ग्वाल्हेर एमआयटीएसमध्ये टीबीवर संशोधन केलेले तरुण शास्त्रज्ञ डॉ. रामप्रमोद तिवारी यांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी रॅपिड कार्ड किट तयार केले आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चअंतर्गत काम करणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)सेंटर, पुणे यांनी किटला मंजुरी दिली अाहे. आता किटच्या मटेरियलसंबंधी आयसीएमआर ऑडिट करणार आहे. कोरोनाच्या संसर्गाची ओळख १० ते १५ मिनिटांत करण्याची क्षमता असलेले किट बाजारात ३०० -४०० रुपयात उपलब्ध होईल. यामुळे लोकांना तपासासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही. या रॅपिड किटमध्ये रक्ताचा नमुना घेतला जातो. १० मिनिटांत ती संसर्गाची स्थिती सांगते. त्यामुळे झटपट तपासण्या पूर्ण होतील. 

बातम्या आणखी आहेत...