आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड चॅरिटी डे आज:भारतात दानशूरांच्या संख्येत वेगाने वाढ

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतरांना दान देण्याचे संस्कार प्रत्येक देशात केले जातात. एका अहवालानुसार गेल्या वर्षी जगात ३०० कोटी लोकांनी अज्ञातांना दान दिले. या दानशूरांमध्ये ५५ टक्के तरुण आहेत. १४० कोटी लोकांनी लाभदायी संस्थांना दान दिले आहे. जगातील दानशूर व दानाची स्थिती जाणून घेऊया..

कोरोनापूर्वी १२४ वा, आता १४ वा क्रमांक दातृत्वात २०१८ मध्ये १४४ देशांच्या यादीत भारताचा क्रमांक १२४ व्या स्थानी होता. त्यानुसार केवळ २२ टक्के लोकांनी दान दिले होते. आज भारत यादीत १४ व्या स्थानी आहे. दात्यांची संख्या दुप्पट झाली. दातृत्वात २०१८ पर्यंत अमेरिका आघाडीवर होती. परंतु आता अमेरिका, न्यूझीलंड, ब्रिटनसारखे देशांत दात्यांच्या संख्येत घट झाली.

इंडोनेशिया जगात सर्वाधिक उदार दान देण्यात इंडोनेशिया उदार आहे. तेथे प्रत्येकी १० पैकी आठ व्यक्ती दान देतात. त्यानंतर केनिया, नायजेरिया, म्यानमार, ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो.

जपानचे लोक सर्वाधिक कंजूष दान देण्याच्या बाबतीत जपानचे लोक सर्वात पिछाडीवर आहेत. १२ टक्के लोकांचा त्यावर विश्वास आहे. त्यानंतर पोर्तुगाल, बेल्जियम, इटलीचा क्रमांक लागतो.

१०० वर्षांत सर्वात मोठ्या दानशूरांच्या यादीत जमशेदजी टाटा अव्वल

दानशूर दान उद्देश जमशेदजी टाटा, भारत 8.2 शिक्षा-आरोग्य बिल-मेलिंडा गेट्स, अमेरिका 6.0 आरोग्य हेन्री वेलकम, ब्रिटन 4.5 आरोग्य होवार्ड हग्स, अमेरिका 3.1 आर एंड डी वाॅरेन बफे, अमेरिका 2.9 आरोग्य जॉर्ज सोरो, अमेरिका 2.8 मानवी हक्क-न्याय हेन्स विल्सडॉर्फ, स्विट्जरलैंड 2.5 सामुदायिक विकास जेके लिली सर, अमेरिका 2.2 सामुदायिक विकास जॉन डी रॉकफेलर, अमेरिका 2.1 आरोग्य एडसेल फाेर्ड, अमेरिका 2.1 मानवी हक्क-न्याय

बातम्या आणखी आहेत...